जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / मिलिंद सोमण असा पडला स्वतःपेक्षा 25 वर्षांनी लहान असलेल्या अंकिताच्या प्रेमात!

मिलिंद सोमण असा पडला स्वतःपेक्षा 25 वर्षांनी लहान असलेल्या अंकिताच्या प्रेमात!

मिलिंद सोमण असा पडला स्वतःपेक्षा 25 वर्षांनी लहान असलेल्या अंकिताच्या प्रेमात!

सध्या सोशल मीडियावर कोरोना व्हायरस बद्दल बोललं जात असताना मिलिंद-अंकिताच्या या लव्हस्टोरीची पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 19 मार्च : सध्या जगभरात कोरोना व्हायरसची दहशत पसरली आहे. सोशल मीडिया असो वा टीव्ही सगळीकडे या व्हायरसबद्दलच बोललं जात आहे. या व्हायरसमुळे अनेक लोकांना स्वतःला घरात कोंडून घ्यावं लागलं आहे. यात अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींचा सुद्धा समावेश आहे. पण तरीही हे सेलिब्रेटी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहे. काहीजण त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहे. अशात अभिनेता मिलिंद सोमणची एक पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यात त्यानं त्याची लव्ह स्टोरी सांगितली आहे. मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता कोनवार नेहमीच सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. हे दोघंही त्यांचे फिटनेस व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. पण त्यांचं लग्न आणि लव्हस्टोरी याच्याबद्दल सर्वांनाच एक वेगळं आकर्षण वाटत आलेलं आहे. 2018 मध्ये हे कपल लग्नाच्या बेडीत अडकलं मात्र त्याआधी 2014 पासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते. मिलिंदनं त्याच्या इन्स्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली ज्यात त्यांनं जेव्हा पहिल्यांदा अंकिताला पाहिलं तेव्हाच तो तिच्या प्रेमात कसा पडला हे सांगितलं आहे. शाहरुख खान ठरला Hyundai Creta चा पहिला मालक, जाणून घ्या काय आहे किंमत आणि फिचर्स सध्या सोशल मीडियावर कोरोना व्हायरस बद्दल बोललं जात असताना मिलिंद-अंकिताच्या या लव्हस्टोरीची पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अंकिताचा क्लोजअप फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर करत मिलिंदनं लिहिलं, ‘2014… लव्ह अ‍ॅट फर्स्ट साइट’ या फोटोमध्ये अंकिताच्या चेहऱ्यावर एक निरागस हसू पाहायला मिळत आहे. मिलिंदच्या या पोस्टवर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

जाहिरात

याशिवाय अंकितानंही तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती आणि मिलिंद निवांतपणे एकमेकांसोबत वेळ घावताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना अंकितानं लिहिलं, जेव्हा तुम्ही तुमच्या ट्रॅव्हलिंगला मिस करत असाल आणि त्यामुळे तुमची चिडचिड होत असेल तर तुम्ही तुमचे जुने फोटो पाहा. तुम्हाला नक्कीच फ्रेश वाटेल. तुम्हाला सोशल डिस्टेंसिंगनंतर कसं वाटत आहे आणि तुम्ही त्याच्याशी कसं डील करत आहात तुमचा अनुभव शेअर करा. जिम ट्रेनर कतरिनाने आलियाला दिले व्यायामाचे धडे, पाहा हा VIDEO

सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरलेल्या या कपलनं जवळपास 4 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 2018 मध्ये अलीबागमध्ये लग्न केलं. या दोघांच्या वयात जवळपास 25 वर्षांचं अंतर आहे. ज्यामुळे या दोघांना अनेकदा ट्रोल सुद्धा केलं गेलं आहे. Coronavirus दरम्यान मालदिवमध्ये एन्जॉय करतेय अभिनेत्री, शेअर केले HOT PHOTOS

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात