मुंबई, 19 मार्च : बिग बॉसच्या 12 व्या सीझनमध्ये अनुप जलोटा यांची गर्लफ्रेंड असल्याचं सांगत एंट्री करणारी अभिनेत्री आणि गायिका जसलीन मथारू काही दिवसांपूर्वी पारस छाब्राच्या मुझसे शादी करोगे या शोमध्ये पोहोचल्यानं खूप चर्चेत राहिली होती. या घरातील तिचा प्रवास सुद्धा बराच गाजला आणि अखेर ती या शोमधूनही बाहेर पडली. पण या शोमधून बाहेर पडल्यानंतर जसलीन आणि तिच्या कुटुंबीयांना वेगळ्याच समस्येला तोंड द्यावं लागत आहे. जसलीन मथारूचे वडील केसर मथारू यांना काही दिवसांपूर्वीच एक धमकीचा कॉल आला आहे. ज्यानंतर मथारू कुटुंबीय खूपच काळजीत आहेत. हिंदुस्तान टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार कॉल करणाऱ्या व्यक्तीनं केसर मथारू यांच्याकडे पैशांची मागणी केली आहे आणि जर हे पैसे दिले नाहीत तर ती व्यक्ती पूर्ण कुटुंबाला मरुन टाकेन अशी धमकी या व्यक्तीनं दिली आहे. ईशा गुप्तानं शेअर केला बाथटबमधील VIDEO; चाहते म्हणाले, ‘हाय गर्मी…’
प्रसारमाध्यमांशी बोलताना केसर मथारू यांनी सांगितलं की, अनेकदा मला अशा प्रकारचा कॉल आल्यानंतर मी ओशिवारा पोलिस स्टोशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी जसलीन राहत असलेल्या बिल्डिंगची सुरक्षा तपासली आहे. जसलीनच्या वडिलांनी सांगितलं की त्यांना वारंवार ती व्यक्ती वेगवेगळ्या नंबरवरून कॉल करत आहे आणि कुटुंबाला मारण्याची धमकी देत आहे. शाहरुख खान ठरला Hyundai Creta चा पहिला मालक, जाणून घ्या काय आहे किंमत आणि फिचर्स दरम्यान याबाबत पोलिसांनी सांगितलं की, याबाबत मथारू कुटुंबानं तक्रार दिली आहे. आम्ही याबाबत आम्ही जास्त काही बोलू शकत नाही तपास सुरू आहे. हे फोन कॉल्स सुरू झाल्यापासून जसलीन आणि तिच्या कुटुंबानं स्वतःला घरात कोंडून घेतलं आहे. जिम ट्रेनर कतरिनाने आलियाला दिले व्यायामाचे धडे, पाहा हा VIDEO