मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO : Coronavirus मुळे सेलिब्रेटी बसलेत घरी, सलमान-कतरिनानं केलं ‘हे’ काम

VIDEO : Coronavirus मुळे सेलिब्रेटी बसलेत घरी, सलमान-कतरिनानं केलं ‘हे’ काम

सलमान खाननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

सलमान खाननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

सलमान खाननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

  • Published by:  Megha Jethe
मुंबई, 19 मार्च : चीनच्या वुहान शहरापासून सुरू झालेल्या या कोरोना व्हायरसनं (Coronavirus) आता जगभरात थैमान घातलं आहे. याचा परिणाम बॉलिवूड इंडस्ट्रीवरही झाला असून अनेक कलाकार या व्हायरसबद्दल खबरदारी म्हणून शूटिंग बंद करून घरी बसले आहेत. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र सर्वच सेलिब्रेटी त्याच्या चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहे. काही सेलिब्रेटींनी मात्र सध्या ते काय करत आहेत याचे व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यात सलमान खान आणि कतरिना कैफ यांचाही समावेश आहे. सलमान खाननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो भल्या पाहाटे उठून स्केचिंग करताना दिसत आहे. या व्हिडीओत तो गाणं गात गात दोन महिलांचं चित्र काढताना दिसत आहे. या चित्रातून त्यानं जात-धर्म न मानता या संकटात एकमेकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहा असा मेसेज दिला आहे. त्याच्या या व्हिडीओचं खूप कौतुक केलं जात आहे. रिकाम्या वेळेचा उपयोग सलमान योग्य रितीनं करत असल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे. मिलिंद सोमण असा पडला स्वतःपेक्षा 25 वर्षांनी लहान असलेल्या अंकिताच्या प्रेमात!
View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

दुसरीकडे सलमानची एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफचा सुद्धा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. कतरिनानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती गिटार वाजवताना दिसत आहे. मात्र विशेष म्हणजे या व्हिडीओला आवाज नाही. कतरिनानं या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘काम चालू आहे. आशा आहे की काही दिवसांमध्ये आवाज येईल. अंकुश तिवारीला मी निराश करु शकत नाही.’ ईशा गुप्तानं शेअर केला बाथटबमधील VIDEO; चाहते म्हणाले, ‘हाय गर्मी...’
View this post on Instagram

Work in progress sound coming soon in a few days hopefully ‍♀️can’t let down @ankurtewari #staysafe

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

फक्त सलमान कतरिनाच तर बॉलिवूडच्या इतर सेलिब्रेटींनी सुद्धा त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात करिना कपूर, आलिया भट, प्रियांका चोप्रा यांचा समावेश आहे. प्रियांका चोप्रा होळी साजरी करण्यासाठी भारतात आली होती. त्यानंतर ती पुन्हा अमेरिकेला परतली मात्र तेव्हा पासून ती घरातून बाहेर पडलेली नाही. मागच्या 8 दिवसांपासून आपण घरात अडकल्याचं प्रियांकानं तिच्या इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये सांगितलं होतं. शाहरुख खान ठरला Hyundai Creta चा पहिला मालक, जाणून घ्या काय आहे किंमत आणि फिचर्स
First published:

Tags: Bollywood, Katrina kaif, Salman khan

पुढील बातम्या