मुंबई, 15 ऑगस्ट : मलायका-अर्जुन असो वा मग रणबीर आलिया. सध्या बॉलिवूडमध्ये खुलेआम प्रेमाचा ट्रेंड सुरू आहे. अशातच आता बॉलिवूडची आणखी एक अभिनेत्रीच्या अफेअरची चर्चा बॉलिवूडमध्ये सुरू आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर भूमि पेडणेकर आहे. सिने इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केल्यापासून वेगवेगळ्या अभिनेत्यांशी भूमिचं नाव जोडलं गेलं. मात्र काही काळानं या सर्व अफवा असल्याचं समोर आलं. पण आता पुन्हा एकदा भूमि एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात आहे. पाकिस्तानात गाणाऱ्या मीका सिंगला दणका; भारतात घालण्यात आली बंदी! मुंबई मिररनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार भूमि पेडणेकर ‘मित्रों’ सिनेमातील अभिनेता जॅकी भगनानीसोबत रिलेशनशिमध्ये आहे. रिपोर्टनुसार भूमि पेडणेकर आमि जॅकी भगनानी यांच्यामध्ये मैत्रीच्याही पलिकडे काही आहे. रिपोर्टनुसार भूमि आणि जॅकी रोज एकत्र जिमला जातात. अनेकदा ती जिम संपल्यावर जॅकीच्याच कारमधून जाताना स्पॉट करण्यात आलं आहे. त्यामुळे या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना जोर आला आहे. मात्र या दोघांनीही याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. काही दिवसांपूर्वी एका मुलाखातीत भूमिनं तिच्या खासगी जीवनाविषयी सांगितलं होतं. ती म्हणाली, मी एक मॉडर्न मुलगी आहे आणि मी अनेकांना डेट केलं आहे. ‘या’ स्टार सेलिब्रिटींची भावंडं दिसतात त्यांच्यापेक्षाही सुंदर! पाहा PHOTO
भूमि पुढे म्हणाली, ‘प्रामाणिकपणे सांगते, त्यावेळी मला समज नव्हती. मी आजही माझ्या एक्स बॉयफ्रेंड्सची चांगली मैत्रीण आहे.’ भूमि शेवटचा सिनेमा ‘सोनचिड़िया’ हा होती. या सिनेमात ती सुशांत सिंग राजपूतसोबत दिसली होती. मात्र तिचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नव्हता. सध्या भूमि ‘पति, पत्नी और वो’च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. यामध्ये ती कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे यांच्यासोबत दिसणार आहे. एकीकडे भूमिचं नाव जॅकी भगनानीसोबत जोडलं जात असताना दुसरीकडे कार्तिक आणि साराच्या रिलेशनशिपचीही चर्चा सगळीकडे सुरू आहे. ‘दिवसातून 10 वेळा रडायचे मी’ … बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीनं सांगितलं सत्य ============================================================================= SPECIAL REPORT : मिकाला तो परफॉर्मन्स पडला भारी, गाण्यावर भारतात आली बंदी

)







