नवी दिल्ली, 08 ऑगस्ट: भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या तनावाचे वातावरण आहे. भारताने जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम 370 रद्द केल्यापासून पाकिस्तान आक्रमक झाला आहे. अशातच बॉलिवडूमधील गायक मीका सिंग याने एक मोठी चूक केली आणि त्या चुकीवरून प्रथम टोल झाल्यानंतर आता थेट त्याच्यावर बंदीच घालण्यात आली आहे. मीकाने पाकिस्तानमधील एका कार्यक्रमात भाग घेतला होता. या घटनेवरून मीकाला काही दिवसापासून सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागत आहे. पाकिस्तान मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार माजी राष्ट्रपती जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या नातेवाईकाच्या लग्न समारंभात मीकाने गाण म्हटले होते. त्यानंतर अशीही बातमी समोर आली होती की या कार्यक्रमासाठी भारताला हवा असलेला दहशतवादी दाऊद इब्राहिम आणि त्याचे कुटुंबीय देखील आले होते. या सर्व घटनेमुळे मीकावर नवे संकट कोसळले आहे. पाकिस्तानमध्ये केलेल्या कार्यक्रमामुळे ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन(AICWA)ने मीकावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. AICWAचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, मीकाचे मूव्ही प्रोडोक्शन हाऊस, म्यूझिक कंपनी आणि ऑनलाईन कंटेन प्रोव्हायडर सोबतचे सर्व करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय असोसिएशनने मीकाच्या चित्रपटात, गाण्यात आणि कंपनी सोबत काम करण्यावर देखील बंदी घातली आहे. AICWAने घेतलेल्या निर्णयानुसार यापुढे चित्रपट सृष्टीतील कोणीही मीकासोबत काम करणार नाही. असे जर कोणी केले तर त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. दोन्ही देशात तणाव असताना मीका देशाच्या गौरवा वाढवण्याऐवजी पैशांला महत्त्व देतो, असे गुप्ता म्हणाले. असं धाडस करू नका, तलावात उडी मारणे तरुणाला पडले महागात, पाहा हा VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







