

बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींना आपण फॉलो करतो. त्याच्या खासगी जीवनाविषयी जाणून घ्यायला आपल्याला आवडतं. त्यांच्या ब्रेकअप आणि अफेअर्सच्या चर्चा तर नेहमीच चालतात मात्र त्यांच्या भावडांविषयी आपल्याला फार कमी माहिती आहे. यंदाच्या रक्षाबंधनाच्या निमित्तानं जाणून घेऊयात स्टार कालाकारांच्या भावंडांविषयी ज्यांच्याबद्दल आपण कधीच ऐकलं नाही.


अभिनेता कार्तिक आर्यनला एक लहान बहीण आहे. कार्तिकच्या बहीणीचं नाव कृतिका असून ती नुकतीच ग्रॅज्यूएट झाली आहे. ती कार्तिकला कोकी तर कार्तिक तिला किटू म्हणून हाक मारतो.


अभिनेत्री बिपाशा बासूलाही दोन बहीणी आहेत. मोठी बिदिशा तर लहान विजयेता. विजयेताचं नुकतंच लग्न झालं असून तिच्या लग्नाचे फोटो बिपाशानं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. मात्र या दोघीही बॉलिवूडपासून लांब आहेत.


अभिनेत्री क्रिती सेननची बहीण नुपूर अनेक ठिकाणी तिच्यासोबत दिसते. सध्या तरी नुपूर बॉलिवूडपासून दूर असली तरीही ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल असं म्हटलं जात आहे.


विकी कौशलचा भाऊ सनीला फार कमी लोकं ओळखतात. सनी अक्षय कुमारच्या 'गोल्ड' सिनेमात दिसला होता. लुकच्या बाबतीत सनी विकीपेक्षा भाव खावून जातो.


अभिनेत्री भूमि पेडणेकरची बहीण समीक्षा वकील आहे. मात्र भूमि तिला लवकरच बॉलिवूमध्ये आणण्याच्या तयारीत आहे. ग्लॅमरच्या बाबतीत समीक्षा सुद्धा भूमिपेक्षा कमी नाही.


अभिनेत्री दिशा पाटनीची बहीण खूशबू पाटनी ही आर्मी ऑफिसर आहे. दिशा अनेकदा तिचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.