मुंबई, 14 ऑगस्ट : ‘ते सहा महिने मी इतकी डिप्रेस्ड होते की, दिवसातून 10 वेळा रडायचे. मी आयुष्यात पुन्हा उभी राहूच शकणार नाही, असं वाटायला लागलं होतं. मी सलग सहा महिने मीडियापासून दूर होते. नवे सिनेमे साइन केले नाहीत की कुठे परफॉर्म केलं नाही. नीट खाणं नाही, झोप नाही, छातीवर दडपण यायचं… वाटायचं आता सगळं संपलं!…’ हे अनुभव सांगितले आहेत प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने. प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या व्यक्तीच्या आयुष्यातही असं टोकाचं नैराश्य येऊ शकतं यावर विश्वास बसणार नाही. पण परिणीतीनं स्वतःच याविषयी एका कार्यक्रमात सांगितलं. ‘जबऱ्या जोडी’ हा तिचा नवा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. आगामी ‘केसरी’चं गाणं लाँच झालं आहे. या पार्श्वभूमीवर एका टॉक शोमध्ये नैराश्यग्रस्त अवस्थेबद्दल पहिल्यांदाच परिणीता उघडपणे बोलली. 2014-15 मध्ये आपण डिप्रेशनमध्ये गेलो होतो, असं परिणीतीने सांगितल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. “त्या काळात आयुष्यात सकारात्मक काहीच घडत नव्हतं. दावत ए इश्क दणकून आपटला होता. हातात नवा प्रोजेक्ट नव्हता, पैसा संपत आला होता. त्यात माझं ब्रेकअप झालं. रिलेशनशिपमध्येही दुःख आलं…” परिणीता सांगते. ‘या’ मराठी हिरोईनचा पती आहे साउथचा रॉकस्टार, वापरतो 6 कोटींची व्हॅनिटी व्हॅन 2014 पर्यंत परिणीताचे इशकजादे, लेडिज व्हर्सेस रिकी बहेल, शुद्ध देसी रोमान्स यासारखे तीन हिट सिनेमे येऊन गेले होते. ती म्हणते, मी भरपूर पैसा कमावला होता. घर घेतलं होतं. अचानक सगळं हातातून जातंय असं वाटायला लागलं. “या काळात मी सहा महिने सगळ्यापासून दूर होते. घरी बसून टीव्ही बघायचा, जाईल तेवढं खायचं एवढेच उद्योग होते. मित्र-मैत्रिणी एवढंच काय घरच्यांपासून पण मी दूर होते. दोन आठवड्यातून एखादा फोन घरी व्हायचा.” पण या काळात भाऊ सहेज चोप्रानं मला साथ दिली. या वाईट काळातून बाहेर यायला त्यानंच मदत केली, असंही परिणीती सांगते. स्टायलिस्ट संजना बत्रा या आपल्या मैत्रिणीचाही परीने उल्लेख केला. तिच्यामुळे आणि भावामुळे आपण नैराश्यातून बाहेर येऊ शकलो, असं ती म्हणाली. “मी त्या वेळी 25 वर्षांची होते आणि अगदी धोकायदायक नाजूक अवस्थेत होते. हळूहळू त्यातून बाहेर पडले. नवे सिनेमे साईन केले आणि आयुष्य पुन्हा एकदा आत्मविश्वासाने हातात घेतलं.” अभिनेत्री नेहा पेंडसे अडकणार लग्नाच्या बेडीत, पाहा कोण आहे तिचा होणारा नवरा नैराश्यातून बाहेर पडणारी आणि त्याबद्दल उघडपणे बोलणारी परिणीता पहिली अभिनेत्री नाही. अनुष्का शर्मा आणि दीपिका पदुकोण या दोघींनी यापूर्वीच मानसिक तणाव आणि आजारांबद्दल जाहीरपणे सांगितलं आहे. दीपिकाने तर डिप्रेशनवर रीतसर ट्रीटमेंट घेतली होती. अनेक जण नैराश्यग्रस्त होतात. पण इतर आजारांसारखा त्यावर लगेच इलाज केला जात नाही. या गोष्टी लपवण्याकडे अजूनही कल असतो. VIDEO : नाना पूरग्रस्तांच्या भेटीला, राजकारण करणाऱ्यांना फटकारलं
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







