अजय देवगणमुळे आजही अविवाहित आहे तब्बू; म्हणाली, मी त्याच्यावर खूप...

अजय देवगणमुळे आजही अविवाहित आहे तब्बू; म्हणाली, मी त्याच्यावर खूप...

एक काळ असाही होता जेव्हा तब्बूचं नाव अजय देवगणशी जोडलं जात होतं. मात्र अजय देवगणनं काजोलशी लगीनगाठ बांधली आणि 48 वर्षीय तब्बू आजही अविवाहित आहे.

  • Share this:

मुंबई, 31 मे : बॉलिवूड अभिनेत्री तब्बू आणि अजय देवगण यांनी आता पर्यंत इंडस्ट्रीला अनेक सुपरहिट सिनेमा दिले आहेत. या दोघांनी एकत्र काम केलेले 'विजयपथ', 'हकीकत', 'तक्षक', 'दृश्यम', 'गोलमाल अगेन', 'दे दना दन' सिनेमे बॉक्स ऑफिसवर तुफान चालले. एक काळ असाही होता जेव्हा तब्बूचं नाव अजय देवगणशी जोडलं जात होतं. मात्र अजय देवगणनं काजोलशी लगीनगाठ बांधली आणि 48 वर्षीय तब्बू आजही अविवाहित आहे. पण काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत तब्बूनं याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे.

काही दिवसांपूर्वी तब्बूनं एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. ज्यामध्ये ती तिच्या आणि अजयच्या नातेसंबंधांवर मोकळेपणानं बोलली. तब्बू म्हणाली, मी आणि अजय एकमेकांना मागच्या 25 वर्षांपासून ओळखतो. अजय माझ्या चुलत भावाचा समीर आर्याचा शेजारी आणि खूप जवळचा मित्र होता. त्यावेळी आम्ही दोघंही एकत्र मोठे झालो आणि आमची मैत्री सुद्धा घट्ट होत गेली. जेव्हा मी लहान होते तेव्हा समीर आणि अजय माझ्यावर लक्ष ठेवत असत. ते दोघंही माझा पाठलाग करत आणि जर एखाद्या मुलानं माझ्याशी बोलायचा प्रयत्न केला तर हे दोघं त्याला मारण्याची धमकी देत असत. त्यामुळे आज मी अविवाहित असण्याचं कारण अजय आहे. त्याच्या या अशा वागण्यामुळे माझं लग्न झालं नाही.

लॉकडाऊनमध्ये बिग बींसोबत घडलं असं काही, जे याआधी 78 वर्षांत कधीच झालं नाही

जेव्हा तब्बूला विचारण्यात आलं की अजय देवगणनं तुझं लग्न लावण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली आहे असं आम्ही ऐकलं आहे. हे खरं आहे का? यावर तब्बू म्हणाली, हो मी त्याला दर एक-दोन दिवसांनी फोन करून सांगते की मला लग्नासाठी एक मुलगा शोध. या मुलाखतीत तब्बू म्हणाली, बॉलिवूड अभिनेत्यांमध्ये जर कोणावर जास्त विश्वास करत असेन तर तो अजय आहे. अजयवर मी खूप विश्वास करते. आजही आमचं मैत्रीचं नातं खूप खास आहे.

वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर अजय देवगण लवकरच 'सूर्यवंशी'मध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय त्याचे 'भुजः द प्राइड ऑफ इंडिया', 'मैदान' हे दोन सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तसेच एसएस राजामौली यांच्या RRR मध्ये स्पेशल अपिअरन्समध्ये दिसणार आहे. तर तब्बू 'भूल भूलैय्या 2'मध्ये दिसणार आहे.

आज अनेकांसाठी देवदूत; मात्र एकेकाळी सोनू सूदनेही सहन केलेत ट्रेनचे धक्के

टायगरनं वेगवान कारसमोर केला स्टंट, 14 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला VIDEO

First published: May 31, 2020, 9:24 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading