मुंबई, 30 मे : बॉलिवूड अभिनेता सोनू सूदचं नाव आज संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरलं आहे. लॉकडाऊनच्या काळात सोनू सर्वांसाठी देवदूत ठरत आहे. अनेक प्रवासी मजूरांना त्यानं त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी मदत केली आहे आणि अद्यापही करत आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावरही सर्वांपेक्षा सोनू सूदच्या नावाची जास्त चर्चा होताना दिसत आहे. अशात आता सोनूचा एक जुना फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. हा फोटो तेव्हाचा आहे जेव्हा सोनू सूद पंजाब वरून मुंबईत आला होता आणि त्यावेळी तो लोकल ट्रेनमधून प्रवास करत असे. सोनू सूदचा हा फोटो ट्विटरवर पहिल्यांदा व्हायरल झाला आहे. 23 वर्षांपूर्वीचा हा फोटो आहे जेव्हा सोनू त्याचं अभिनेता होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईमध्ये आला होता. त्यावेळी लोकल ट्रेनचा प्रवास करण्यासाठी त्यानं काढलेल्या ट्रेनच्या पासचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो 1997 च्या पासचा आहे जेव्हा सोनू 24 वर्षांचा होता. इंटीमेट Photos शेअर करुन फसला नवरा, अभिनेत्री म्हणाली; मी त्याला आधीच… त्यावेळी सोनू 420 रूपयांचा पास बोरिवली ते चर्चगेट पर्यंतचा प्रवास करण्यासाठी वापरत होता. एका ट्विटर युजरनं त्याच्या पासचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ज्यानं खरंच संघर्ष केला आहे त्यालाच दुसऱ्याच्या वेदना समजू शकतात. एक काळ असा होता जेव्हा सोनू सूद 420 रुपयांच्या पासावर प्रवास करत होता. ट्रेनचे धक्के सहन करत होता.
Life is a full circle ⭕️ https://t.co/XTVp1ysRaz
— sonu sood (@SonuSood) May 29, 2020
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोवर सोनू सूदनं सुद्धा कमेंट केली आहे. त्यानं लिहिलं, जीवन हे गोल आहे. सोनूच्या या ट्वीटवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये सोनू सूद लोकांना खूप मदत करत आहे. त्याच्या या कामाचं कौतुक केवळ बॉलिवूड सेलेब्स आणि सामान्य लोकांनीच नाही तर अनेक राजकीय व्यक्तींनी सुद्धा केलं आहे. सोनू सूदनं 1999 मध्ये एका टॉलिवूड सिनेमातून त्याच्या अभिनयाला सुरुवात केली होती. 2001 मध्ये त्यानं शहिद ए आजम मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आतापर्यांत सोनूनं अनेक सिनेमात खलनायकाची भूमिका साकारली आहे मात्र खऱ्या आयुष्यात मात्र सध्या तो सर्वांचा हिरो ठरला आहे. इरफानच्या आठवणीत पत्नी सुतापा पुन्हा झाली भावुक, इमोशनल पोस्ट लिहून म्हणाली… अक्षयनं बहिणीसाठी बुक केलं संपूर्ण विमान, युजर्स म्हणाले; मजूरांना बस नाही आणि..