मुंबई, 30 मे : सध्या कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. आशात सामान्य जनतेपासून ते बॉलिवूड सेलिब्रेटींपर्यंत सर्वांनाच आपापल्या घरी राहावं लागत आहे. अनेक दिवसांपासून सिनेमांची शूटिंग बंद पडली आहेत. त्यामुळे अनेक बॉलिवूड स्टार सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधताना दिसतात. बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन सुद्धा सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय झाले आहेत. त्यांनी नुकतंच एक ट्वीट करत त्यांच्या आयुष्यातली अशी गोष्ट चाहत्यांशी शेअर केली आहे जी त्यांच्या आयुष्यात या लॉकडाऊनमुळे घडली आहे. याआधीच्या 78 वर्षांच्या काळात त्यांच्यासोबत ही गोष्ट कधीच घडली नव्हती. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ऑफिशिअल अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. ज्यातील फोटोमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर खूपच गंभीर भाव दिसत आहेत. या फोटोला त्यांनी जे कॅप्शन दिलं आहे त्यात त्यांनी 78 वर्षांच्या कालावधीत त्यांच्यासोबत पहिल्यांदाच घडलेल्या या गोष्टीबद्दल सांगितलं आहे. त्यांनी लिहिलं, या लॉकडाऊनमध्ये मी जेवढं काही शिकलो, नव्या गोष्टी समजून घेतल्या तेवढं मी माझ्या आयुष्याच्या 78 वर्षांमध्ये कधीच केल्या नव्हत्या, समजून घेतल्या नव्हत्या. हे सत्य सांगणं हा याच शिकवणीचा आणि समजून घेण्याचा परिणाम आहे. या पोस्टमध्ये अमिताभ बच्चन यांनी लॉकडाऊनच्या पॉझिटिव्ह साइडकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. त्यांचा हा अंदाज त्यांच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. टायगरनं वेगवान कारसमोर केला स्टंट, 14 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला VIDEO
T 3547 - इस Lockdown के काल में जितना मैंने सीखा, समझा, और जाना , उतना मैं अपने 78 वर्षों के जीवन काल में न सीख सका, न समझ सका और न ही जान सका !
— Amitabh Bachchan (@SrBachchan) May 30, 2020
इस सच्चाई को व्यक्त करना , इसी सीख, समझ और जानने का परिणाम है ! 🙏 pic.twitter.com/ofacrb7PiK
अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केलेल्या पाहायला मिळत आहेत. अमिताभ बच्चन त्यांच्या पोस्टमधून चाहत्यांना मार्गदर्शन करताना दिसत आहेत. याआधीही त्यांची एक पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली होती. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या दोन फोटोसह लिहिलं होतं, ‘दो दिन का ये मेला है, दो दिन का आना है जाना है, जीवन चलते जाना है’. अमिताभ बच्चन त्यांच्या चाहत्यांना अशा अनेक पोस्टमधून सकारात्मक संदेश देत असतात. सध्या सर्व सेलिब्रेटींप्रमाणे अमिताभ बच्चन सुद्धा त्यांच्या कुटुंबासोबत त्यांच्या घरी आहेत. मात्र या सगळ्यात ते त्यांच्या चाहत्यांशी मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत संवाद साधताना दिसत आहेत. याशिवाय कोरोना व्हायरस संबंधीत जनजागृती करण्याचं काम सुद्धा ते करताना दिसत आहेत. इंटीमेट Photos शेअर करुन फसला नवरा, अभिनेत्री म्हणाली; मी त्याला आधीच… इरफानच्या आठवणीत पत्नी सुतापा पुन्हा झाली भावुक, इमोशनल पोस्ट लिहून म्हणाली…