खतरनाक! टायगरनं वेगवान कारसमोर केला स्टंट, 14 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला VIDEO

खतरनाक! टायगरनं वेगवान कारसमोर केला स्टंट, 14 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला VIDEO

टायगर श्रॉफ वेगात चालणाऱ्या कारसमोर खतरनाक स्टंट केला आहे. त्याचा हा स्टंट खरंच अंगावर शाहारे आणतो.

  • Share this:

मुंबई, 30 मे : बाकी बॉलिवूड स्टार प्रमाणे टायगर श्रॉफ सुद्धा सध्याच्या लॉकडाऊनचा काळ त्याच्या कुटुंबीयांसोबत घालवताना दिसत आहे. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात मात्र आहे. टायगरनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो खूप व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये टायगर श्रॉफ वेगात चालणाऱ्या कारसमोर खतरनाक स्टंट करताना दिसत आहे.

टायगर श्रॉफचा हा व्हिडीओ पाहिल्यावर कोणीही हैराण होईल. या व्हिडीओमध्ये टायगर एका वेगात येणाऱ्या कार समोर पाठमोरा उभा आहे आणि जशी ती कार जवळ येते तसा टायगर बॅक फ्लिप मारुन त्या कारला क्रॉस करतो. टायगरचा हा स्टंट खरंच अंगावर शहारे आणतो. हा व्हिडीओ शेअर करताना त्यानं लिहिलं, माझा स्पायडी सेन्स मला किक करत आहे. क्वारंटाईन नंतर ड्रायव्हिंग करणारे लोक असे असतील.

इरफानच्या आठवणीत पत्नी सुतापा पुन्हा झाली भावुक, इमोशनल पोस्ट लिहून म्हणाली...

View this post on Instagram

Good thing my spidey sense kicked in.... people driving around post quarantine be like 🙉

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff) on

सोशल मीडियावर टायगरचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 14 लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. लोकांनीा कमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर लॉकडाऊनच्या अगोदर टायगरचा 'बागी 3' हा सिनेमा रिलीज झाला होता. ज्यात तो श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुखसोबत दिसला होता. याशिवाय या सिनेमात अंकिता लोखंडेचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती.

दीपिकानं शेअर केला मोबाइल स्क्रीनशॉट; पाहा फॅमिली ग्रुपमध्ये कसा वागतो रणवीर

अक्षयनं बहिणीसाठी बुक केलं संपूर्ण विमान, युजर्स म्हणाले; मजूरांना बस नाही आणि..

First published: May 30, 2020, 3:48 PM IST

ताज्या बातम्या