मुंबई, 10 मे: ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाची सगळीकडेच चर्चा आहे. अनेक जण या चित्रपटाला विरोध करत आहेत तर अनेक प्रेक्षक हा चित्रपट पाहण्याची विनंती करत आहेत. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर देखील चांगलीच कमाई करताना दिसून येत आहे. ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावर तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यात बंदी घालण्यात आली आहे. चित्रपटाला सगळीकडे विरोध आणि प्रदर्शनं होत आहेत आणि त्यामुळे समाजात त्यामुळे तेढ निर्माण होईल अशी कारणं देत या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. पण आता त्यानंतर या चित्रपटाबाबतीत एक चांगली बातमी समोर येत आहेत. ‘द केरळ स्टोरी’ रिलीज झाल्यापासून अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. पश्चिम बंगालमध्ये चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे, तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही तो टॅक्स फ्री दाखवण्यात येणार असल्याचं घोषित केलं आहे. या सगळ्यांमध्ये चित्रपटाबाबतीत एक चांगली बातमी समोर येत आहे, जी ऐकून चाहते नक्कीच खुश होतील. हा चित्रपट आता जवळपास 37 देशांमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. बुधवारी, केरळ स्टोरीची मुख्य अभिनेत्री अदा शर्माने ट्विटरवर ही माहिती शेअर केली आहे. तिच्या चित्रपटाचांगला प्रतिसाद दिल्याबद्दल तिने चाहत्यांचे आभारही मानले आहेत.
अडा शर्माने ट्विटमध्ये लिहिलंय कि, ‘आमचा चित्रपट पहिला असलेल्या तुम्हा सर्वांचे कोटी कोटी धन्यवाद, तो ट्रेंड केल्याबद्दल धन्यवाद, माझ्या अभिनयाचे कौतुक केल्याबद्दल धन्यवाद. या आठवड्याच्या शेवटी 12 वी ‘द केरळ स्टोरी’ आता 37 देशांमध्ये किंवा त्यापेक्षाही अधिक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर रिलीज होत आहे’ असं म्हणत तिने भावना व्यक्त केल्या आहेत. भारतात या चित्रपटाला ठिकठिकाणी विरोध होत असताना चित्रपट निर्मांत्यांसाठी ही बातमी नक्कीच सुखावणारी आहे. Shoaib-Dipika: तब्बल 3 वर्ष बेरोजगार पतीचा खर्च उचलत होती अभिनेत्री; अभिनेत्याने असे मानले बायकोचे आभार द केरळ स्टोरी रिलीज होऊन आज पाच दिवस उलटले असून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आतापर्यंत 56.86 कोटींची कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट 100 कोटींचा टप्पा गाठेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात अदा शर्माने केरळ स्टोरीला ‘प्रपोगंडा’ चित्रपट म्हणणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले होते. ‘काही लोक या चित्रपटाला प्रोपगंडा म्हणत आहेत. तुम्ही गुगलवर ISIS आणि Brides हे दोन शब्द सर्च करा. यात गोऱ्या लोकांचे म्हणणे ऐकून तुम्हाला हा भारतीय चित्रपट किती खरा आहे हे समजेल.’ असं ट्विट करत तिने विरोधकांना सणसणीत चपराक दिली होती.
Thank you to all the crores of you who are going to watch our film,thank you for making it trend,thank you for loving my performance.This weekend the 12th #TheKeralaStory releases internationally in 37 countries (or more) ❤️❤️ #adahsharma pic.twitter.com/XiVnvBIQPw
— Adah Sharma (@adah_sharma) May 10, 2023
विपुल शाह निर्मित ‘द केरळ स्टोरी’ गेल्या शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात सापडला आणि प्रकरण न्यायालयातही पोहोचले. पण या सगळ्या गदारोळात ‘द केरळ स्टोरी’ने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार सुरुवात केली. ज्याप्रकारे त्याचे शो हाऊसफुल्ल चालले आहेत, ते पाहता अदा शर्माचा हा चित्रपट लवकरच मोठा आकडा गाठू शकतो.