मुंबई, 10 मे: अभिनेत्री दीपिका कक्कर या ना त्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. तिचं एक यु ट्युब चॅनल असून त्यावर ती तिच्या आयुष्याशी संबंधित गोष्टींचा खुलासा करत असते, दीपिकाने शोएब इब्राहिमशी लग्नगाठ बांधल्यानंतर धर्म बदलल्याने चर्चेत आली होती. ती याच गोष्टीमुळे ट्रॉलर्सच्या निशाण्यावर असते. पण ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करत ती आपलं काम करत राहते. दीपिका सध्या प्रेग्नेंट असून ती पतीसोबत गरोदरपणाच्या प्रत्येक दिवसाचा आनंद घेत आहे. अनेकदा दोघेही त्यांच्या चाहत्यांसह त्याची झलक शेअर करतात. अलीकडेच दोघांनी आयुष्याशी संबंधित एक गोष्ट शेअर केली आहे. शोएब आणि दीपिकाची भेट ‘ससुराल सिमर का’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. दोघांची ही मालिका खूपच हिट झाली होती. पण हा शो सोडल्यानंतर मात्र शोएबला कठीण काळाला सामोरं जावं लागलं होतं. याबद्दलचा खुलासा शोएबने नुकताच एका मुलाखतीत केला आहे. शोएब हिट शोमध्ये प्रेम ही भूमिका करत होता आणि तर त्याची पत्नी दीपिका कक्करसोबत काम करत होता. मात्र, हा शो हिट असताना शोएबने तो मध्येच सोडला होता. त्याने हा शो का सोडला असं विचारलं असता शोएबने सांगितलं की, ‘शोमध्ये त्याच्या व्यक्तिरेखेसाठी काहीच राहिले नव्हते आणि यामुळे तो निराश झाला. शोबद्दल तो कृतज्ञ असला तरी, अभिनेता म्हणून तो समाधानी नव्हता आणि म्हणूनच त्याने शो सोडण्याचा निर्णय घेतला.’
मात्र, शोएब इब्राहिमचा ‘ससुराल सिमर का’ सोडल्यानंतरचा प्रवास सोपा नव्हता कारण त्याच्याकडे 3 वर्षे कोणतेही काम नव्हते. शोएबने ‘ससुराल सिमर का’साठी काम करताना वाचवलेल्या पैशातून पहिल्या वर्षी स्वत:ला कसे तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले आणि खर्चाचे व्यवस्थापन केले. या काळात दीपिका कक्करने त्याला मदत केली. ते त्यावेळी चांगले मित्र होते आणि ते एकाच इमारतीत राहत असत. शोएबने सांगितले की तो एकटाच राहत होता आणि दीपिकाने त्याला जेवणासाठी मदत केली. गेल्या 14 वर्षांपासून ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने केलं नाहीये रात्रीचं जेवण; कारण वाचून व्हाल चकित जेव्हा कठीण वेळ आली तेव्हा शोएबने उघड केले की त्याच्या कुटुंबाने त्याला साथ दिली आणि दीपिका ककर देखील त्याच्या मागे खंबीरपणे उभी राहिली. याशिवाय अभिनेत्याने खुलासा केला की, ‘मी काही बचत केली होती आणि काही काळासाठी माझा खर्च कमी केला होता. त्यानंतर दीपिकाने मला खूप सपोर्ट केला. ते मी अभिमानाने स्वीकारतो. माझ्या वडिलांनीही मला पैसे देऊन मला मदत केली. तसेच आमचे संपूर्ण कुटुंब दीपिकाचे खूप आभारी आहे की त्यांनी इतके प्रेम केले आणि आम्हाला प्रत्येक प्रकारे साथ दिली.’ असे त्याने सांगितले आहे. ‘ससुराल सिमर का’ या शोमध्ये काम करताना दीपिका ककर आणि शोएब इब्राहिम एकमेकांच्या प्रेमात पडले होते. 22 फेब्रुवारी 2018 रोजी भोपाळमध्ये या लव्हबर्ड्सनी लग्नगाठ बांधली. आता दोघेही लवकरच आई-बाबा बनणार आहेत. आयुष्यातील या नवीन काळाला सामोरं जाण्यासाठी दोघेही खूप उत्सुक आहेत.