'द केरळ स्टोरी' या चित्रपटाची सगळीकडेच चर्चा आहे. अनेक जण या चित्रपटाला विरोध करत आहेत तर अनेक प्रेक्षक हा चित्रपट पाहण्याची विनंती करत आहेत.
तरण आदर्श या चित्रपट समीक्षकाने त्यांच्या ट्विटर हँडलवर या चित्रपटाचे बॉक्स ऑफिसवरील आकडे शेअर केले आहेत.
चित्रपटाने सोमवारी 10.07 कोटींची कमाई केली असून तिसऱ्या दिवशी चित्रपटाने एकूण 45.72 कोटी कमावले होते.
आज मंगळवारी प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी हा चित्रपट तब्बल 50 कोटींचा टप्पा पार करेल असं बोललं जातंय.
'द केरळ स्टोरी' हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे. केरळमधील 32,000 हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना इस्लाम स्वीकारल्यानंतर ISIS मध्ये सामील होण्यासाठी जबरदस्तीने सीरियात पाठवण्यात आले होते. या मुद्द्यावरून हा सिनेमा आहे.