Home /News /entertainment /

VIDEO: 'छत्रपती' शिवाजी महाराज म्हणणं 'Optional' नाही, चिन्मय मांडलेकरच्या या कृतीमुळे होतंय कौतुक

VIDEO: 'छत्रपती' शिवाजी महाराज म्हणणं 'Optional' नाही, चिन्मय मांडलेकरच्या या कृतीमुळे होतंय कौतुक

चिन्मय मांडलेकरचा छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Chinmay Mandlekar Viral Video) होत आहे. स्वत: चिन्मय मांडलेकरने देखील त्याच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे

  मुंबई, 19 मार्च: 'पावनखिंड' (Pawankhind Marathi Movie) सिनेमाचं अफलातून यश आणि त्यानंतर 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतल्यानंतर अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar as Bitta Karate in The Kashmir Files) विशेष चर्चेत आला आहे. चिन्मय मांडलेकर या हरहुन्नरी अभिनेत्याने दोन्ही सिनेमात परस्पराविरुद्ध भूमिका साकारल्या आहेत. विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाला सध्या प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. त्यात बिट्टा कराटे (Bitta Karate) ही भूमिका चिन्मय मांडलेकर साकारत आहे. 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटात भयंकर दहशतवादी बिट्टा कराटे म्हणजेच म्हणजेच फारुख अहमद दार याचं पात्र दाखवण्यात आलं आहे. या बिट्टानं 20 नागरिकांना 1990 मध्ये ठार मारलं होतं, त्यापैकी बहुतेकजण काश्मिरी पंडित होते. या भूकिकेमुळे चिन्मय मांडलेकर हे मराठी नाव देशभरात पोहोचलं आहे. या भूमिकेचं तर कौतुक होतंच आहे, पण आणखी एका व्हिडीओमुळे चिन्मय सध्या चर्चेत आला आहे. हे वाचा-होळीदिवशी The Kashmir Files पुढे फिका पडला 'बच्चन पांडे'चा रंग, किती झाली कमाई? चिन्मय मांडलेकरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Chinmay Mandlekar Viral Video) होत आहे. स्वत: चिन्मय मांडलेकरने देखील त्याच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ एका टीव्ही चॅनेलवरील मुलाखती दरम्यानचा आहे. ज्यामध्ये अँकर चिन्मयला असा प्रश्न विचारतो की, 'या सिनेमामध्ये तुम्ही अशी भूमिका केली आहे ज्याचा सर्वाधिक द्वेष केला जातो. तुमच्या आजुबाजुचे लोकं यावर कशी प्रतिक्रिया देत आहेत. कारण तुम्ही शिवाजींची (छत्रपती शिवाजी महाराज) साकारली आहे, आणि आता तुम्ही ज्याचा सर्वाधिक राग-द्वेष केला जात आहे असा दहशतवादी बिट्टा कराटेची भूमिका करत आहात.' यावेळी अँकरला मध्येच थांबवत आणि त्यांची चूक सुधारत चिन्मय मांडलेकर असं म्हणतो की, 'सर छत्रपती शिवाजी महाराज, तुम्हाला मध्येच थांबवल्याबद्दल माफ करा. पण एक मराठी म्हणून आम्ही कधीच त्यांना शिवाजी म्हणत नाही. नेहमी छत्रपती शिवाजी महाराजच म्हणतो.' चिन्मयच्या या उत्तरावर अँकर देखील त्याच्या बोलण्याला दुजोरा देत आणि त्यावर स्पष्टीकरण देताना पाहायला मिळत आहे. चिन्मयच्या चाहत्यांनी तसंच अनेक मराठी-अमराठी बांधवांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. महाराजांबद्दल असे अभिमानाचे उद्गार काढल्याने चिन्मयचं कौतुक होताना दिसत आहे. हे वाचा-The Kashmir Files मध्ये चिन्मय मांडलेकरने साकारलेला बिट्टा कराटे नेमका आहे तरी कोण? हा व्हिडीओ शेअर करताना चिन्मयने अशी कॅप्शन दिली आहे की, ' कारण काही गोष्टी 'Optional' नसतात. कधीच. छत्रपती शिवाजी महाराज की जय'. चिन्मयच्या या कॅप्शनचं देखील कौतुक होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारल्यानंतर त्याला चाहत्यांकडून वाहवा मिळत होतीच, पण आता या उत्तरानंतर चिन्मयचा अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी कमेंटमध्ये दिली आहे.
  चिन्मयच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' असं म्हटले आहे. तर अनेकांनी चिन्मयच्या उत्तराचं कौतुक केलं आहे. 'तुमचा अभिमान आहे', 'जय शिवराय', 'या गोष्टी खरंच ऑप्शनल नाही आहेत' अशा कमेंट्स अनेकांनी केल्या आहेत आणि चिन्मयवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. हा व्हिडीओ 'पावनखिंड' सिनेमाचा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर याने देखील शेअर केला आहे. त्याने हा व्हिडीओ शेअर करताना मित्राप्रति असणारं त्याचं प्रेम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी त्याने आदर व्यक्त केला आहे. तो म्हणतो की, 'निव्वळ अभिमान...निव्वळ अभिमान.. मित्रा चिन्मय, माझ्या माहितीतला सर्वोत्कृष्ट अभिनेता, माझा जवळचा मित्र, माझा भाऊ म्हणून तुझा अभिमान होताच.. परंतु, आजच्या या कृतीने यशाच्या वेगळ्या शिखरावर असताना सुद्धा तू आपल्या दैवताला विसरला नाहीयेस हे पाहून अभिमानाने ऊर भरून आला. छत्रपती शिवाजी महाराज तुझ्या पदरात अशाच प्रकारच्या यशाच्या ओंजळीचा कृपाप्रसाद घालत राहोत ही त्यांच्या चरणी प्रार्थना.. जय शिवराय.. हर हर महादेव'. हे वाचा-VIDEO:'तुम्ही 'पावनखिंड' साजरा करताय,आम्ही धन्य झालो', प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून चिन्मय मांडलेकर भावुक दरम्यान द कश्मीर फाइल्सआधी प्रदर्शित झालेल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर मांडणाऱ्या ‘पावनखिंड’ (Pawankhind) सिनेमात चिन्मय मांडलेकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. दिग्पाल लांजेकर या दिग्दर्शकाने पावनखिंड या सिनेमा प्रेक्षकांसमोर मांडला आहे. ज्यामध्ये बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका अजय पूरकर यांनी साकारली आहे. चिन्मयने याआधी दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'फर्जंद' आणि 'फत्तेशिकस्त' या सिनेमातही छत्रपती शिवाजी महाराज साकारले आहेत.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Bollywood, Bollywood actor, Jammu and kashmir, Jammu kashmir, Marathi cinema, Marathi entertainment

  पुढील बातम्या