Home /News /entertainment /

The Kashmir Files च्या दिग्दर्शकाला जीवाची भीती, विवेक अग्निहोत्रींच्या ऑफिसमध्ये घुसून दोघांची मॅनेजरला धक्काबुक्की

The Kashmir Files च्या दिग्दर्शकाला जीवाची भीती, विवेक अग्निहोत्रींच्या ऑफिसमध्ये घुसून दोघांची मॅनेजरला धक्काबुक्की

Vivek Agnihotri

Vivek Agnihotri

आज अनेक रेकॉर्ड्स The Kashmir Files हा सिनेमा मोडत असला तरीही अनेकांनी या सिनेमाविषयी नाराजी व्यक्त केली आहे, मात्र चिंतेची बाब अशी की द कश्मीर फाइल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 24 मार्च: 'द कश्मीर फाइल्स'या (The Kashmir Files BO Collection) सिनेमाने 200 कोटी (The Kashmir Files crosses 200 crores) क्लबमध्ये प्रवेश केला आहे. बॉलिवूडमध्ये 200 कोटींची कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीमध्ये आता द कश्मीर फाइल्स देखील असणार आहे. या सिनेमाने प्रदर्शनानंतर वर्ल्ड वाइड 228.85 कोटींची कमाई केली आहे, स्वत: विवेक अग्निहोत्री यांनी इन्स्टाग्राम पोस्ट करत याविषयी माहिती दिली आहे. दरम्यान एकीकडे या सिनेमाच्या मेकर्ससाठी आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे त्यांची चिंता देखील वाढली आहे. अनेकांनी या सिनेमाविषयी नाराजी व्यक्त केली आहे, मात्र चिंतेची बाब अशी की द कश्मीर फाइल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे. अलीकडेच अशी घटना घडली की त्यांच्या ऑफिसमध्ये दोन लोकं जबरस्तीने घुसले आणि मॅनजरसह धक्काबुक्की केली आहे. विवेक अग्निहोत्री यांनी या सिनेमाला मिळत असलेल्या या यशानंतर त्यांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. त्यांनी एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, त्यांना धमकावले जात आहे. बॉलिवूड हंगामाने याविषयी वृत्त दिले आहे. हे वाचा-The Kashmir Files बाबत बोलता-बोलता थांबले 'तारक मेहता', VIDEO VIRAL या मुलाखतीमध्ये विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri Interview) म्हणाले की, 'ही घटना घडली तेव्हा मी आणि माझी पत्नी (अभिनेत्री पल्लवी जोशी) ऑफिसमध्ये नव्हतो. एक ज्येष्ठ मॅनेजर होत्या ज्यांना त्या मुलांनी त्यांना दरवाजाकडे ढकलून दिलं, त्या खाली पडल्या. त्यानंतर त्यांनी माझ्याविषयी विचारलं आणि त्यांनी तिथून पळ काढला.' अग्निहोत्रींच्या मते त्यांनी या घटनेची वाच्यता कुठे केली नाही कारण त्यांना अशा लोकांना कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी मिळवून द्यायची नव्हती.
  विवेक अग्निहोत्री पुढे म्हणाले की, जगभरातील प्रेक्षक हा सिनेमा शांतपणे बघत आहेत. जगभरातील काश्मिरी पंडितांपर्यंत हा सिनेमा पोहोचल आहे. हा सिनेमा कॅनडामध्ये एवढं चांगलं प्रदर्शन का करत आहे? याठिकाणी सुरुवात 2 शो नी झाली होती, आता सिनेमाचे 90 शो होत आहेत. हा सिनेमा भारतीयांना एकमेकांशी जोडत असल्याचे विवेक अग्निहोत्रींचे म्हणणे आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी असे वृत्त समोर आले होते की, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना गृह मंत्रालयाने Y कॅटगिरीची सुरक्षा पुरवली आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Bollywood, Bollywood News, Jammu and kashmir, Jammu kashmir

  पुढील बातम्या