मुंबई, 24 मार्च: विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केलेला ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files BO Collection) हा सिनेमा प्रत्येक दिवशी नवा रेकॉर्ड करत आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची धुम तर पाहायला मिळतेच आहे, शिवाय चाहते-समीक्षकांनी देखील या सिनेमाला (Reactions on The Kashmir Files) अक्षरश: डोक्यावर उचलून धरले आहे. अनेक कलाकार देखील हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन पाहत आहेत आणि त्यावर प्रतिक्रिया देत आहे. दरम्यान अलीकडेच या चित्रपटाविषयी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Tarak Mehta Ka Oolta Chashmah) फेम शैलेश लोढा यांची प्रतिक्रिया समोर आहे. या चित्रपटाविषयी बोलताना काहीसे थांबून ‘नि:शब्द; झाल्याची प्रतिक्रिया शैलेश यांनी दिली आहे. बॉलिवूड तसेच टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकार या द कश्मीर फाइल्सविषयी आपलं मत नोंदवत आहेत. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या प्रसिद्ध मालिकेत ‘मेहता’ ही भूमिका साकारणारे शैलेश लोढा यांना जेव्हा Paparazzi नी प्रश्न विचारला की हा सिनेमा कसा वाटला, त्यावेळी बोलताना मध्येच ते काहीसे थांबले आणि म्हणाले ‘स्पीचलेस झालो आहे काही बोलता येणार नाही. फिल्म नाही हे आंदोलन आहे.’ कोईमोई या पोर्टलने त्यांच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हे वाचा-‘ हिंदीत काम करायला मिळावं म्हणून लग्न जुळवलं’, हृता दुर्गुळेने सांगितला ट्रोलिंगचा धक्कादायक प्रकार काही युजर्सनी असे म्हटले आहे की कदाचित शैलेश यांना सुपर्ब म्हणायचे होते, पण ते नि:शब्द झाले. शैलेश लोढा यांनी देखील हा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असे म्हटले आहे की, ‘बस एवढंच बोलू शकलो.’
200 कोटी क्लबमध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ ‘द कश्मीर फाइल्स’या सिनेमाने 200 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे. बॉलिवूडमध्ये 200 कोटींची कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीमध्ये आता द कश्मीर फाइल्स देखील असणार आहे. या सिनेमाने प्रदर्शनानंतर आतापर्यंत 200.13 कोटींची कमाई केली आहे, तरण आदर्श यांनी याविषयी माहिती दिली आहे.
बच्चन पांडेला मोठा फटका द कश्मीर फाइल्स हा सिनेमा पँडेमिकमध्ये सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. द कश्मीर फाइल्स थिएटरमध्ये असताना प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’ला बॉक्स ऑफिसवर मोठा फटका बसला आहे. हा सिनेमा देखील प्रेक्षकांना आकर्षित करण्यास यशस्वी ठरत असला तरी ‘द कश्मीर फाइल्स’ मुळे ‘बच्चन पांडे’ची कमाई अपेक्षेपेक्षा कमी झाली आहे. शिवाय या सिनेमाची चर्चा देखील कमी झाली आहे.