मुंबई, 01 डिसेंबर : अभिनेत्री तेजस्विनी लोणारी बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात स्पर्धक म्हणून दाखल झाली. घरात पहिल्या दिवसापासूनच तेजस्विनी हे नाव टॉप 5मध्ये असल्याचा प्रतिक्रिया समोर येत होत्या. तेजस्विनी अत्यंत हुशारीनं आणि सगळ्यांना एकत्र घेऊन गेम खेळत होती. मात्र टास्कमध्ये झालेल्या मारामारीमुळे तेजस्विनीच्या हाताला गंभीर दुखापत झाली. तरीही तिनं एक आठवडा दुखऱ्या हातानं घरात तिचा वावर कायम ठेवला मात्र तिचा त्रास वाढू लागला. तसंच तिच्या प्रत्येक कामासाठी तिला दुसऱ्या अवलंबून राहावं लागल्यानं तिला नाइलाजानं घरातून एक्झिट घ्यावी लागली. बिग बॉसच्या आदेशानुसार प्रकृतीच्या कारणामुळे तेजस्विनी लोणारी सारखी तगडी स्पर्धक बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. तिच्या जाण्यानं अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी तर बिग बॉस बघणं सोडून दिल्याचं समोर आलं आहे. घरातून बाहेर येताच तेजूनं काही दिवस आराम केला आणि त्यानंतर अखेर तिनं तिचं मन मोकळं केलं आहे.
बिग बॉसमधून बाहेर पडताच तेजस्विनीला तिच्या प्रेम करणारी अनेक माणसं भेटली. तेजू म्हणाली, 'मी ज्या हॉटेलमध्ये एक रात्र राहिले त्या हॉटेलचे कर्मचारी मला त्या हॉटेलमध्ये पाहिल्या पाहिल्या रडायला लागले. आज तर शनिवार नाही मग तुम्ही कशा बाहेर आलात? तुम्ही बिग बॉसना सांगून थांबायचं ना घरातच, असे अनेक प्रश्न मला येत होते आणि त्यावर मला काहीच उत्तर देता येत नव्हती'.
View this post on Instagram
तेजस्विनी पुढे म्हणाली, 'हॉलेटमधून बाहेर पडल्यावर ज्या गाडीतून घराकडे निघाले ते ड्रायव्हर दादा कंठ दाटून तुम्ही कसे हवे होतात फिनालेमध्ये हे वारंवार सांगत होते. मी माझ्यासाठी तळमळीने बोलणारी माणसे घरातून बाहेर पडल्यावर काही मिनिटात अनुभवत होते'.
तेजस्विनीची ही भावुक पोस्ट पाहून तिच्या चाहत्यांनी देखील प्रेमाचा वर्षाव केला आहे. एका चाहत्यानं म्हटलंय, 'तू एकटीच विनर होतीस या घरात. आता बिग बॉस बघायचंच नाही. कारण जितकी पॉझिटिव्हिटी होती तितकी आता नाही'. तर दुसऱ्या चाहत्यानं म्हटलंय, 'तेजस्विनी काळजी घे तेजस्विनी. आम्ही खूप प्रयत्न केले तुझ्या साठी पणं नशिबाने साथ नाही दिली'. तसंच अनेकांनी, 'तू बाहेर गेल्यापासून आम्ही बिग बॉस बघणं सोडून दिलं आहे अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत'.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss marathi, Colors marathi, Marathi actress, Marathi entertainment, Marathi news