मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Tejaswini lonari : 'हात टुटा है, हौसला नही'; बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर तेजस्विनीने पहिल्यांदाच केलं मन मोकळं

Tejaswini lonari : 'हात टुटा है, हौसला नही'; बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर तेजस्विनीने पहिल्यांदाच केलं मन मोकळं

 तेजस्विनी लोणारी

तेजस्विनी लोणारी

तेजस्विनीने बिग बॉसमधून एक्झिट घेतल्यानंतर पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 01 डिसेंबर :  ‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. पहिल्या दिवसापासूनच घरातील सदस्यांसह प्रेक्षकांनाही आश्चर्याचे धक्के मिळत आहेत. नुकतंच बिग बॉसच्या घरात विजेतेपदाची दावेदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेजस्विनी लोणारीला घराबाहेर पडावे लागले आहे. त्यामुळे तिचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपला आहे. यानंतर आता सगळीकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. तेजस्विनीचे चाहते बिग बॉसच्या या निर्णयावर प्रचंड नाराज आहेत तर अनेक कलाकार सुद्धा बिग बॉसच्या या निर्णयाचा निषेध करत तेजस्विनीला पाठींबा दर्शवत आहेत. अशातच आता तेजस्विनीने घरातून एक्झिट घेतल्यानंतर पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

तेजस्विनी लोणारीचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपला आहे. तेजस्विनीला एका टास्कदरम्यान हाताला गंभीर दुखापत झाली होती. गेले काही दिवस ती घरात हाताला प्लास्टर घेऊन वावरताना दिसली होती. पण असं असलं तरी  तिच्या गेममध्ये ती अजिबात मागे पडली नाही. पण आता  याच कारणामुळे तिला खेळातून बाहेर पडावं लागलं. आता तेजस्विनीने घरातून बाहेर पडताच एक पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा - Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या अनुपस्थितीत रोहित चॅलेंजर्स सोबत घेणार पंगा; काय घडणार घरात?

ही पोस्ट शेअर करताना तेजस्विनीने म्हटलंय कि, ''नमस्कार, कसे आहात सगळे...? हा प्रश्न मी करायच्या आधीच तुम्हाला प्रश्न पडला असेल कि मी कशी आहे...? खरं  सांगू, तुमच्या प्रेमामुळे मी एकदम मस्त आहे. आता फ्रॅक्चरमुळे थोडा हात दुखतो आहे पण तुमच्या प्रेमामुळे त्या वेदना सहन करायची ताकद मला मिळाली आहे. असं म्हणतात कि आईपेक्षा जास्त निर्वाज्य प्रेम करणारे जगात कोणीच नसतं  पण आई पेक्षाही जास्त प्रेम करणारी महाराष्ट्रातील जनता आहे. ती पुढे म्हणतेय कि, घरातून बाहेर पडणे माझ्यासाठी जेवढे अवघड होते तेवढेच तुमच्यासाठी होते. मी तुमच्या प्रेमाच्या ताकदीवर खेळ पुढे खेळण्याचा निर्णय घेतला होता...पण बिग बॉसच्या निर्णयापुढे कसं  जाणार...?

तेजस्विनीची पोस्ट

या पोस्टमध्येच तेजस्विनी पुढे म्हणतेय कि, तुमच्या या प्रेमाच्या ताकदीवर मी लवकर बरे होणारच आहे, पण अधिक मेहनतीने तुमच्या मनोरंजनासाठी सुद्धा सज्ज व्हायचं आहे. शेवटी एकच  सांगेन... हाथ टूटा है, हौसला नही...' तेजस्विनीच्या या पोस्टनंतर चाहतेही चांगलेच भावुक झालेत. ते कमेंट करत तिला धीर देत आहेत.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हाताच्या दुखापतीमुळे तेजस्विनीला पुढील खेळ खेळणे सोयीचे नसल्याने तिला बिग बॉसच्या घरातून तिला निरोप घ्यावा लागला आहे. तेजस्विनीला निरोप देताना घरातील सदस्यही भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. पण काही काळानंतर ती पुन्हा घरात परतण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

First published:

Tags: Bigg boss marathi, Marathi actress, Marathi entertainment