मुंबई, 1 डिसेंबर : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त शो ‘बिग बॉस’ कायमच चर्चेचा विषय असतो. सध्या सोशल मीडियावरही ‘बिग बॉस मराठी 4’ चा गाजावाजा पहायला मिळतोय. दिवसेंदिवस शो अधिक रंजक होत चालला असून प्रेक्षक आपल्या आवडत्या स्पर्धकांना सपोर्ट करत आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर ते आपल्या आवडत्या स्पर्धकांना पाठिंबा देत आहेत. बिग बॉसच्या घरातील स्पर्धक तेजस्विनी लोणारीच्या सपोर्टमध्ये अनेक कलाकार पोस्ट शेअर करत आहेत. अशातच आता आणखी कलाकारांनी तेजस्विनीला पाठिंबा देत पोस्ट शेअर केल्या आहेत. तेजस्विनीच्या सपोर्टमध्ये नुकताच अभिनेता रणवीर सिंहने एक व्हिडीओ शेअर केला होता. रणवीरने तेजूला शुभेच्छा दिल्यानंतर सगळेच थक्क झाले होते. त्याने तेजूला जिंकूण ये म्हणत शुभेच्छा दिल्या होत्या. अशातच आता तेजूला अभिनेत्री गायत्री दातार आणि अभिनेता अभिजीत केळकरनेही पाठिंबा दर्शवला आहे. तेजस्विनीच्या सपोर्टमध्ये पोस्ट शेअर करत गायत्रीने म्हटलं की, ‘वीनर’. आणि अभिजितने लिहिलं की, ‘तुला कोणत्याही कारणानं बाहेर काढलं किंवा बाहेर पडावं लागलं तर मी बिग बॉस बघणं बंद करेल. तू विनर व्हायचंय’. टीआरपी मराठीने यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. सध्या या पोस्टवर अनेक कमेंटचा भडिमार होत असल्याचं दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून तेजस्विनी लोणारीची प्रकृती ठिक नाहीये. त्यामुळे तिला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घर सोडावे लागणार, अशी घोषणा बिग बॉसने केली आहे. ही घोषणा करताच घरातील सदस्यांनी अश्रू अनावर झाले. तेजू घराबाहेर पडणार म्हटल्यावर चाहते खूप नाराज झाले असून ते तेजस्विनीला वीनर पाहत असल्याचं म्हणत आहेत. अनेकजण सोशल मीडियाद्वारे तेजूला घराबाहेर न जाण्याविषयी पोस्ट शेअर करत आहेत.
दरम्यान, तेजस्विनी लोणारी ही पहिल्या पासून घरातील उत्तम स्पर्धक राहिली आहे. तिने तिच्या स्वभावामुळे आणि गेम स्टॅटर्जींमुळे बिग बॉसच्या स्पर्धकांचं मन जिंकलं आहे. आता तिला अचानक प्रकृतीमुळे बाहेर पडावे लगाणार आहे. त्यामुळे याचा बिग बॉसच्या पुढील गेमवर याचा काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.