मुंबई, 23 मार्च- झी मराठीवरील मन उडू उडू झालं या लोकप्रिय मालिकेतील कलाकारांनी म्हणजे दीपू आणि इंद्राने नुकतीच किचन कल्लाकारमध्ये हजेरी लावली. दीपूची भूमिका मालिकेत ऋता दुर्गुळे साकारताना दिसत आहे. तर इंद्राच्या भूमिकेत अजिंक्य राऊत दिसत आहे. छोट्या पडद्यावर दीपू आणि इंद्राची जोडी लोकप्रिय आहे. हृता दुर्गुळेचा
(Hruta Durgule) सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. किचन कल्लाकारमध्ये हृता दुर्गुळेने तिच्या वैय़क्तिक आयुष्याबद्दल एक मोठा खुलासा केला.
किचन कल्लाकारमध्ये संकर्षण कऱ्हाडेने हृता दुर्गुळेनला एक प्रश्न विचारला की, सोशल मीडियावर तुला अशा कोणत्या गोष्टीचा सामना करावा लागला ज्यामुळे तिला खूप त्रास सहन करावा लागला. यावर हृताने तिच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या घटनेबद्दल सांगितलं.ती म्हणाली की, मी जेव्हा प्रतीक शाहला डेट
(Hruta Durgule Engagement) करत असल्याचे सांगितले तेव्हा मला लोकांनी खूप वाईट पद्धतीनं ट्रोल केलं. तेव्हा खरं मी खूप निराश झाल्याचे तिनं यावेळी सांगितलं.
हृता पुढे म्हणाली की, माझा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. मी कधीही माझ्या वैयक्ति आय़ुष्याबद्दल सोशल मीडियावर काही पोस्ट केले नव्हते. माझे सोशल मीडियावर 2.3 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. पण मला वाटलं की, माझ्या आयुष्यातील ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, ती मी सगळ्यांसोबत शेअर केली. म्हणून मी हिंदी टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीशी संबंधीत प्रतीक शाहसोबत साखरपुडा करत असल्याचे सांगितले. यावेळी लोकांनी मला ट्रोल करायला सुरूवात केलं कारण मी एका हिंदी मालिका दिग्दर्शक प्रतीक शाहसोबत
(hindi tv director prateek shah) लग्न करणार आहे.
वाचा-
'तारक मेहता..' मध्ये का होत नाहीय दयाबेनची वापसी?जेठालालने सांगितलं खरं कारण
ती पुढे म्हणाली की, माझ्या आयुष्यातील इतका महत्त्वाचा भाग माझ्या सोशल मीडिया चाहत्यांसोबत शेअर करण्याचे मी ठरवले होते पण लोकांनी मला ट्रोल केले. नेहमी मराठी अभिनेत्री हिंदी किंवा हिंदी भाषेत काम करणाऱ्या लोकांशी लग्न का करतात. तसेच मला हिंदी मालिकेत काम करायचे आहे म्हणून मी त्याच्याशी लग्न करत असल्याचे, असे म्हणत लोकांनी मला ट्रोल केले. शिवाय काहींनी त्याच्या दिसण्यावरून देखील ट्रोल केल्याचे तिनं यावेळी सांगितले. यावेळी मला खूप वाईट वाटल्याचे देखील तिनं सांगितलं.
वाचा-
कार्तिकसाठी दोन तरुणींनी एयरपोर्ट केलं असं काही,अभिनेत्याने मारला कपाळावर हात
हृता दुर्गुळेने बॉयफ्रेंड प्रतिक शाह याच्याशी 24 डिसेंबर रोजी साखरपुडा केला आहे. तिनं प्रतिक शाहला डेट करत असल्याची कबुली सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. प्रतीक हा हिंदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे. त्याने अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे. 'तेरी मेरी इक जिंदडी', 'बेहद २', 'बहु बेगम', 'कुछ रंग प्यार के ऐसे भी', 'एक दिवाना था' यांसारख्या मालिकांचं दिग्दर्शन प्रतीकने केलं आहे.
मास मीडिया या पदवी अभ्यासक्रमातील जाहिरात क्षेत्रात शिक्षण घेतलेली अभिनेत्री हृता दुर्गुळे हिच्या 'दुर्वा' या मालिकेतून सर्वांसमोर आली. या मालिकेनं जवळपास हजार भागांचा टप्पा पूर्ण केला होता. त्यानंतर ती 'फुलपाखरू' मालिकेत ती मुख्य भूमिकेत होती. तिची क्रेज पाहता मराठी अभिनेत्रींमध्ये सोशल मीडियावर सर्वात जास्त लोकप्रिय असलेली अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.