‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम बबिता रिअल लाइफमध्ये करतेय टप्पूला डेट?

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम बबिता रिअल लाइफमध्ये करतेय टप्पूला डेट?

Tarak Mehta Ka Ulta Chashma मुनमुन दत्तानं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेले फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

  • Share this:

मुंबई, 25 जून : सब टीव्ही वरील लोकप्रिय कॉमेडी शो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मागच्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. दयाबेन म्हणजेच दिशा वकानीनं ही मालिका सोडल्यानंतरही तिची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही आणि विशेषतः या मालिकेतील बबिताजी आणि टप्पू या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या खूप जवळच्या आहेत. नव्या टप्पूच्या रुपात सध्या राज अनादकट सध्या प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. तर बबीता म्हणजेच मुनमुन दत्ता सुद्धा सुरुवातीपासून च प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध आहे. पण नुकतंच मुनमुन दत्तानं तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले ज्यात तिच्यासोबत राज सुद्धा दिसत आहे. हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

अभिनेता वरुण धवन ‘या’ दिवशी अडकणार लग्नाच्या बेडीत

 

View this post on Instagram

 

Photo Bombing 📸 😝 . . . . #rajanadkat #shoot #fun #masti #photobombing #singapore #tmkoc

A post shared by Raj Anadkat (@raj_anadkat) on

मुनमुनने शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती राज सोबत लंच करताना दिसत आहे. पण यावेळी त्यांच्यातील जवळीक पाहता आता मुनमुन आणि राज एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मुनमुन आणि राज रविवारी आउटिंग गेले होते. त्यानंतर त्यांनी एकत्र जेवण केलं. यावेळचे काही फोटो मुनमुनने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले होते. ज्यात राज तिच्यासोबत मस्ती करताना दिसत आहे. या फोटोंवरून राज आणि मुनमुन यांच्यामध्ये मैत्री पलिकडेही काही असल्याचा अंदाज लावला जात आहे.

करिना कपूरवर आली तलावात आंघोळ करायची वेळ, फोटो व्हायरल

मुनमुन दत्ता मागच्या अनेक वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेत काम करत आहे. तर राजनं 2017मध्ये या मालिकेत एंट्री घेतली आहे. या मालिकेत तो जेठालालचा मुलगा टप्पूची भूमिका साकारत आहे आणि त्याच्या या भूमिकेच खूप कौतुक केलं जात आहे. खरं तर हा रोल राजसाठी खूप आव्हानात्मक होता. कारण छोट्या टप्पूची भूमिका या आधी भव्य गांधी साकारत होता आणि प्रेक्षकांमध्ये त्याची वेगळीच क्रेझ होती. मात्र त्याने हा शो सोडल्यानंतर नव्या टप्पूला प्रेक्षक कसं स्वीकारतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहीलं होतं. पण राजनं फार कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात त्याचं वेगळं स्थान तयार केलं.

सोशल मीडियावरील 'त्या' फोटोवरून शाहरूख खानची लेक झाली ट्रोल

या मालिकेत मुनमुन दत्ता बबिता अय्यरची भूमिका मागील अनेक वर्ष साकारत आहे. ही मालिका प्रेक्षकांमध्ये कमालीची लोकप्रिय आहे. सध्या प्रेक्षक दयाबेन म्हणजेच दिशा वकानीच्या परत येण्याची वाट पाहत आहेत. मात्र तिच्या परत येण्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मानधनाच्या मुद्द्यावरुन निर्माता आणि दिशा यांच्यामध्ये वाद सुरु आहेत. मालिकेत परतण्यासाठी दिशानं बरीच मोठी रक्कम मानधन म्हणून मागितल्याचं बोललं जात आहे.

राकेश रोशन यांनी दहशतवादी म्हटल्यानं भडकला सुनैना रोशनचा बॉयफ्रेंड

====================================================

SPECIAL REPORT: आगीचा खेळ, अस्वलाचे हाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 25, 2019 04:49 PM IST

ताज्या बातम्या