मुंबई, 25 जून : अभिनेत्री करिना कपूर सध्या लंडनमध्ये फॅमिलीसोबत सुट्टी एंजॉय करत आहे. काही दिवसांपूर्वी तिनं तिचा नो मेकअप लुक शेअर केला होता. मात्र त्यामुळे तिला ट्रोल व्हावं लागलं होतं. त्यानंतर आता तिचा आणखी एक फोटो समोर आला आहे ज्यात ती एका तलावात उभी राहून आंघोळ करताना दिसत आहे. करिनानं हा फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला असून फन मोडमधील करिनाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. हा फोटो नेमका कुठला आहे याविषयी तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. सोशल मीडियावरील ‘त्या’ फोटोवरून शाहरूख खानची लेक झाली ट्रोल
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला करिनाचा हा फोटो तिच्या जाहीरातीच्या सेटवरील आहे. करिना नामांकित लक्स साबणाच्या जाहीरातीचं शूट करत होती. याचा एक फोटो आणि व्हिडिओसुद्धा करिनाच्या हेअर स्टायलिस्टनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करतना त्यानं लिहिलं, शेवटी हे असं पूर्ण झालं. हेअर स्टायलिस्टनं शेअर केलल्या या फोटोमध्ये करिना तिच्या बॉडीवर साबण लावत तलावात उभी असलेली दिसत आहे आणि तिच्या आजूबाजूला या जाहीरातीची पूर्ण टीम दिसत आहे. चाहत्यानं न विचारता सेल्फी घेण्याचा प्रयत्न केल्यानं चढला तापसीचा पारा
या जाहीरातीच्या शूटिंग दरम्यान काढलेला हा कँडीड फोटो सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. ही जाहीरात लवकरच रिलीज होणार आहे. करिनानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर केल्यानंतर एली अवरामनं यावर हार्टचा इमोजी पोस्ट कमेंट केला आहे. मागच्या काही काळापासून करिना लंडनमध्ये व्हेकेशनवर आहे. त्यानंतर ती लवकरच ‘अंग्रेजी मीडियम’ सिनेमाच्या शूटिंग सुरुवात करणार आहे. तसेच ती आमिर खानसोबत लाल ‘सिंग चढ्ढा’ या सिनेमातही दिसणार असल्याचं बोललं जात आहे. टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनीचं ब्रेकअप, ‘हे’ आहे खरं कारण
============================================================ SPECIAL REPORT: आगीचा खेळ, अस्वलाचे हाल