मुंबई, 25 जून : अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान बॉलिवूडमधील पॉप्युलर स्टार किड्सपैकी एक आहे. मागच्या काही काळापासून सुहानाच्या बॉलिवूड डेब्यूकडे सर्वांचं लक्ष लागू राहिलेलं आहे. पण बॉलिवूड डेब्यूपूर्वीच आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे सुहना नेहमीच चर्चेत असते. इन्स्टाग्रामवरील तिचे फोटो आणि व्हिडिओ अनेकदा सगळीकडे व्हायरल होत असतात. आताही सुहानासोबत काहीसं असंच घडलं आहे. पण यावेळी मात्र तिला तिच्या सोशल मीडियावरील फोटोंमुळे ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं आहे. चाहत्यानं न विचारता सेल्फी घेण्याचा प्रयत्न केल्यानं चढला तापसीचा पारा
सोशल मीडियावर सध्या सुहानाचे काही लेटेस्ट फोटो व्हायरल होत आहेत. ज्यात ती तिच्या काही विदेशी मित्रमैत्रीणींसोबत पार्टी करताना दिसत आहे. ही पार्टी सुहानानं खूप एंजॉय केल्याचं या फोटोंवरून लक्षात येतं मात्र यातील एका फोटोमध्ये सुहाना तिच्या काही शर्टलेस मित्रांसोबत दिसली आणि याच फोटोवरून नेटिझन्सनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली. एका युजरनं लिहिलं, ‘थोडी तरी लाज बाळग सुहाना तू एक मुस्लीम मुलगी आहेस.’ तर दुसऱ्या एका युजरनं तिला भारतीय संस्कृतीची आठवण करून दिली. त्यानं लिहिलं, ‘सुहाना ही पाश्चिमात्य संस्कृती आहे आणि तू एक भारतीय आहेस. ही ना भारतीय संस्कृती आहे आणि इस्लामिक संस्कृतीही नाही.’ संभाजी मालिकेत या आठवड्यात येणार ‘तो’ क्षण
सुहानाच्या या फोटोवर एका युजरनं तर चक्क ‘म्हैशीसमोर पुंगी वाजवण्याचा काय फायदा. ती स्वतःला मुस्लीम मानत नाही त्यामुळे तिला मुस्लीम म्हणणं इस्लामच्या विरोधात आहे’ अशी कमेंंट केली आहे एकंदर या फोटोंमधील पाश्चात्य संस्कृती आणि सुहानाच्या कपड्यावर तिच्या लोकांनी आक्षेप घेतला आहे. खरं तर अशा प्रकारे ट्रोल होणं सुहानासाठी पहिली वेळ नाही या आधीही बिकिनी फोटो वरूनही तिला नेटीझन्सनी असंच ट्रोल केलं होतं. काही दिवसांपूर्वी सुहाना एका शॉर्ट फिल्ममधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे तिच्या चाहत्यांचं लक्ष आता तिच्या शॉर्ट फिल्मकडे लागून राहिलं आहे. प्रियांका चोप्राच्या ‘या’ जंपसूटची किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क ! ============================================================== SPECIAL REPORT: आगीचा खेळ, अस्वलाचे हाल