मुंबई, 25 जून : अभिनेता वरुण धवन सध्या त्याचा आगामी सिनेमा ‘स्ट्रीट डान्सर’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमामध्ये तो श्रद्धा कपूर सोबत दिसणार आहे. दरम्यान पुन्हा एकदा वरुणच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. तसं पाहायला गेलं तर वरुण आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल यांच्या लग्नाची चर्चा मागच्या बऱ्याच काळापासून सुरू आहे. अनेकदा त्यांच्या लग्नाच्या तारखाही सांगण्यात आल्या मात्र नंतर त्या फक्त अफवा असल्याचं समोर आलं. मात्र आता वरुण आणि नताशाच्या लग्नाची पक्की माहिती समोर आली आहे. राकेश रोशन यांनी दहशतवादी म्हटल्यानं भडकला सुनैना रोशनचा बॉयफ्रेंड
वरुण धवननं ‘स्ट्रीट डान्सर 3D’ चे दिग्दर्शक रेमो डिसूजा यांना या सिनेमाच्या रिलीज डेट पुढे ढकलण्याची विनंती केली आहे. हा सिनेमा 2020मध्ये सुरुवातीला रिलीज झाला तर मग वरुणला सिनेमाच्या प्रमोशनसाठी वेळ देता येणार नाही आहे. स्पॉटबॉय वेबसाइटनं दिलेल्या वृत्तानुसार वरुण या सिनेमाची रिलीज डेट यासाठी पुढे ढकलण्यास सांगत आहे कारण तो येत्या डिसेंबरमध्ये लग्न करणार आहे. सुरुवातीला हा सिनेमा 8 नोहेंबर 2019 ला रिलीज होणार होता. मात्र आता हा सिनेमा ऑगस्ट 2020ला रिलीज होणार असल्याचं बोललं जात आहे. वयाचा 38 व्या वर्षी आफताब शिवदासानी केलं होतं दुसऱ्यांदा लग्न, पाहा लग्नाचे फोटो
वरुण आणि नताशा एकमेकांचे बालपणीचे मित्र आहेत. हे दोघं बरीच वर्ष एकमेकांना डेट करत आहेत. त्यांचं नातं त्यांनी सुरावातीला प्रसार माध्यमांसमोर येऊ दिलं नव्हतं मात्र नंतर त्यांनी आपल्या नात्याची कबूली दिली. काही दिवसांपूर्वी एका मुलाखीत वरुणनं यावर्षी तो लग्न करणार असल्याचा खुलासा केला होता. त्यामुळे आता यंदा एक ग्रँड वेडिंग पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र वरुणचे वडील डेव्हिड धवन यांनी वरुणचं लग्न डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता कमी असल्याचं म्हटलं होतं त्याऐवजी ते दोघं 2020मध्ये लग्न करतील असं त्यांनी म्हटलं होतं. करिना कपूरवर आली तलावात आंघोळ करायची वेळ, फोटो व्हायरल
====================================================== SPECIAL REPORT: आगीचा खेळ, अस्वलाचे हाल