जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / राकेश रोशन यांनी दहशतवादी म्हटल्यानं भडकला सुनैना रोशनचा बॉयफ्रेंड

राकेश रोशन यांनी दहशतवादी म्हटल्यानं भडकला सुनैना रोशनचा बॉयफ्रेंड

राकेश रोशन यांनी दहशतवादी म्हटल्यानं भडकला सुनैना रोशनचा बॉयफ्रेंड

Hritik Roshan Sunaina Roshan रूहैल एक मुस्लीम व्यक्ती असल्यानं माझे कुटुंबीय त्याला स्वीकारायला तयार नाहीत असं सुनैनानं म्हटलं होतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 जून : अभिनेता हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशन काश्मीरी पत्रकार रूहैल अमीनसोबतच्या नात्यामुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. तिच्या कुटुंबीयांनी तिच्या या नात्यामुळे तिला खूप त्रास दिल्याचा आरोप सुनैनानं केला असून रूहैल एक मुस्लीम व्यक्ती असल्यानं माझे कुटुंबीय त्याला स्वीकारायला तयार नाहीत असंही तिनं सांगितलं. सुनैनाच्या या खुलाशामुळे सर्वांना धक्क बसला असून आता यासंबंधी रूहैलनंही प्रतिक्रिया दिली आहे. न्यूज 18 सोबत बोलताना रूहैल यांनी स्पष्ट शब्दात आपले विचार मांडले. ते म्हणाले, या घटनेनं पुन्हा एकदा आजच्या काळात जुनाट विचार संपले आहेत असं म्हणणाऱ्यासाठी ते आजही तसेच असल्याचं सिद्ध केलं आहे. टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनीचं ब्रेकअप, ‘हे’ आहे खरं कारण

जाहिरात

लव्ह जिहादच्या दृष्टीकोनावर रुहैल म्हणाले, ‘हे खूप दुर्भाग्यपूर्ण आहे. कोणालाही त्याच्या धर्मावरून बोलणे हे खरं तर अपमानकारक आहे आणि यावर सर्वांनीच आवाज उठवायला हवा.’ यासोबतच आपण सुनैनाला एका कंपनीसाठी एंटरटेनमेंट कव्हर करतेवेळी भेटलो होतो हे सुद्धा कबूल केलं. त्यानंतर काही काळ आमच्यातील संपर्क पूर्णपणे तुटला होता मात्र आम्ही पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटलो असं रुहैल यांनी सांगितलं. चाहत्यानं न विचारता सेल्फी घेण्याचा प्रयत्न केल्यानं चढला तापसीचा पारा

रहैल पुढे सांगतात, ‘त्यांना आमची मैत्री मान्य नाही. मला हे सुद्धा समजलं की, तिच्या आई-वडीलांनी आमच्या मैत्री बद्दल समजल्यावर तिच्यासोबत सतत एक गार्ड ठेवायला सुरुवात केली. जेव्हा तिनं मला हे सांगितलं तेव्हा मला यावर खूप हसू आलं. मला यावर विश्वासच बसत नव्हता.’ राकेश रोशन यांनी रूहैल यांना दहशतवादी म्हटल्यानं रूहैल भडकले आहेत. Bigg Boss Marathi 2ः शिव- किशोरीमध्ये रंगणार मनोरा विजयाचा कार्य याविषयी बोलताना रुहैल यांनी, ‘एखाद्याला त्याच्या धर्मावरून बोलणं किंवा त्याला आतंकवादी म्हणणं मला अजिबात मान्य नाही. धर्म ही तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या समाजात बोलायची गोष्ट नाही. या गोष्टीवर खरं तर आपण दुर्लक्ष करायला नको. सुनैना तिचं आयुष्य नव्यानं सुरू करू इच्छिते आणि यात तिला तिच्या कुटुंबाने पाठींबा द्यावा अशी तिची अपेक्षा आहे.’ असं मत मांडलं

जाहिरात

=========================================================== SPECIAL REPORT: आगीचा खेळ, अस्वलाचे हाल

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात