मुंबई, 25 जून : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या सौंदर्याशिवाय आणखी एक गोष्टीसाठी ओळखली जाते ते म्हणजे तिचा अभिनय. मात्र तिच्या काही अशा सवयी आहेत ज्याबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. सामान्यपणे शांत दिसणारी तापसीचा पारा कधी कधी एवढा चढतो की, ती दबंग मोडमध्ये येते. बॉम्बे टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार तापसी तिच्या भूमिकेतील 90 टक्के भाग हा तिच्या आसपासच्या लोकांकडून शिकते आणि 10 टक्के भाग हा तिचा स्वतःचा अभिनय असतो. हिमाचल प्रदेशमध्ये शूटिंगदरम्यान एकमेकांसोबत असा वेळ घालवतात सारा- कार्तिक बॉम्बे टाइम्सनं दिलेल्या माहितीनुसार तापसीनं सांगितलं की, ‘मनमर्जिया’ सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान ती तिच्या बहीणीसोबत डिनरसाठी बाहेर गेली होती. जेव्हा ती फुटपाथवर उभी राहून तिच्या ड्रायव्हरची वाट पाहत होती. त्यावेळी एक मुलगा बाइकवरून तिच्या जवळ आला आणि तापसीला न विचारताच त्यानं तिच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. हे पाहून तापसीचा पारा चढला. त्यावेळी ती सिनेमातील रूमीच्या भूमिकेत एवढी शिरली होती की तिनं त्या मुलाच्या कानाखाली मारली. खऱ्या आयुष्यात शनायाचा ‘हा’ आहे गॅरी, सनईचौघडे लवकरच वाजणार?
माहितीनुसार तापसीनं त्या मुलाकडून त्याचा फोन काढून घेतला आणि त्याला तो फोटो लगेचच डिलीट करायला सांगितला आणि असं न केल्यास फोन तोडून टाकण्याची धमकी दिली. रेड सिग्नलवर तापसी सोबत घडलेल्या या घटनेवरून तापसीच्या त्या सिनेमातील भूमिकेचा एका असा पैलू समोर येतो. जो फक्त तिच्या चाहत्यांनाच माहीत असेल. …म्हणून अमिताभ बच्चन यांच्यासोबत फोटो काढल्यावर ट्रोल झाल्या जया
काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला तापसीचा गेम ओव्हर हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई करत आहे. या सिनेमातील तापसीच्या भूमिकेचं खूप कौतुक केलं जात आहे. याशिवाय ती लवकरच ‘सांड की आँख’ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अनुराग कश्यप करत असून हा सिनेमा एका वास्तव घटनेवर आधारित आहे. त्यामुळे या सिनेमाकडून बॉक्स ऑफिसवर चांगला बिझनेस करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
========================================================== VIDEO : भारतीय महिला हॉकी टीमचा बसमध्ये विजयी जल्लोष