खऱ्या आयुष्यात शनायाचा 'हा' आहे गॅरी, सनईचौघडे लवकरच वाजणार?

Isha Keskar, Shanaya, Mazya Navryachi Bayako - शनाया म्हणजेच ईशा केसकरनं नुकतंच इन्स्टाग्रामवर Ask Me Everything द्वारे फॅन्सबरोबर संवाद साधला.

News18 Lokmat | Updated On: Jun 24, 2019 07:15 PM IST

खऱ्या आयुष्यात शनायाचा 'हा' आहे गॅरी, सनईचौघडे लवकरच वाजणार?

मुंबई, 24 जून : छोट्या पडद्यावर ती खूप लोकप्रिय आहे. तिची हटके अदा सगळ्यांनाच आवडते. तिची स्टाइलही लोकप्रिय आहे. तो पण मालिकेत हिरो होता. अनेक तरुणींच्या हृदयाची धडकन होता. आता 'ती' आणि 'तो' गेली दोन वर्ष एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत.

ती म्हणजे सर्वाची लाडकी शनाया. काही वर्षांपूर्वी तिची जय मल्हारमधली बानोची व्यक्तिरेखाही तितकीच लोकप्रिय होती. आता माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतून ती घराघरात पोचलीय. तो म्हणजे ऋषी सक्सेना. काहे दिया परदेस मालिकेतली त्याची भूमिका गाजली होती. अनेक तरुणींच्या हृदयाची तो धडकन होता.

संभाजी मालिकेत या आठवड्यात येणार 'तो' क्षण

शनाया म्हणजेच ईशा केसकरनं नुकतंच इन्स्टाग्रामवर Ask Me Everything द्वारे फॅन्सबरोबर संवाद साधला. पुछ ना असं तिनं इन्स्ट्राग्रामवर टाकलं होतं.यावेळी फॅन्सनी तिला बरेच प्रश्न विचारले. तिची आवडती स्वीट डिश कोणती हा प्रश्न विचारल्यावर तिनं ऋषीचा फोटो टाकत 'हा आणि सगळं स्वीट' असं उत्तर दिलंय.

ईशा आणि ऋषी गेली दोन वर्ष रिलेशनशिपमध्ये आहेत. ईशानं इन्स्ट्रावर  हेही लिहिलं की 29 जुलैला त्यांच्या नात्याला 2 वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यांची भेट कुठे झाली, हाही प्रश्न त्यांना विचारला. तेव्हा तिनं उत्तर दिलं, चला हवा येऊ द्या या शोच्या सेटवर.

Loading...

बॉलिवूडमध्ये फक्त हिटच नाही तर फिटही आहे सलमान खान, हा घ्या पुरावा!

आपण इतक्यात लग्न करणार नाही, असंही तिनं उत्तर दिलंय.

ईशाची पहिल्यांदा माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत एंट्री झाली तेव्हा आम्ही तिला याबद्दल विचारलं होतं. तेव्हा ती म्हणाली होती, ' मला रसिकाच्या शनायाला धक्का लावायचा नाहीय. पण हे एक आव्हान आहे. त्यात प्रयोग करायला मला आवडेल. लोकांचं काय म्हणणं आहे, त्याप्रमाणे मी बदल करेन.'

'या' काश्मिरी पत्रकाराला डेट करतेय हृतिक रोशनची बहीण सुनैना

ईशानं नव्या शूजचं उदाहरण दिलं. ती म्हणाली, ' नवे शूज पायात फिट बसेपर्यंत चावतात, चपला आवाज करतात. पण थोडा संयम ठेवला तर ते फिट बसतात. लोकांनीही माझ्या व्यक्तिरेखेबद्दल थोडा संयम दाखवला पाहिजे.'

ईशा स्वत: कशी आहे ? 'मी कुठलीही परिस्थिती लगेच स्वीकारते.' ईशा सांगतेय. ' माझ्यात निरीक्षण शक्ती आहे. मी माणसांचं निरीक्षण करते. खरं कोण, परकं कोण हे मला लगेच कळते.'

शनायाच्या व्यक्तिरेखेसाठी मला स्वत:ला मेनटेन ठेवावं लागणार आहे, कारण ही शनाया आधुनिक आहे, ईशानं सांगितलं.

'पिवळी साडीवाली' अधिकारी महिलेच्या डान्सचा VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 24, 2019 07:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...