Saand Ki Aankh Trailer: 'तीन चार की जिंदगी बनान खातर तेरी एक की जानभी लेनी पड़ जाए तो कोई हरज ना है..'

बॉलिवूड अभिनेत्री त्यांच्या व्यक्तिरेखेसाठी वाट्टेल ते करायला तयार असतात. त्यामुळे आधीच्या सिनेमात ग्लॅमरस भूमिका साकारलेली अभिनेत्री हीच का असा प्रश्न अनेकांना पडू शकतो.

News18 Lokmat | Updated On: Sep 23, 2019 04:56 PM IST

Saand Ki Aankh Trailer: 'तीन चार की जिंदगी बनान खातर तेरी एक की जानभी लेनी पड़ जाए तो कोई हरज ना है..'

मुंबई, 23 सप्टेंबर- तापसी पन्नू (Taapsee Pannu) आणि भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) यांच्या 'सांड की आंख' (Saand Ki Aankh) सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. बॉलिवूड अभिनेत्री त्यांच्या व्यक्तिरेखेसाठी वाट्टेल ते करायला तयार असतात. त्यामुळे आधीच्या सिनेमात ग्लॅमरस भूमिका साकारलेली अभिनेत्री हीच का असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. असंच काहीसं 'सांड की आंख' या सिनेमाच्याबाबतीतही झालं.

तुषार हिरानंदानी दिग्दर्शित या सिनेमात विनीत सिंह आणि प्रकाश झा देखील दिसणार आहेत. येत्या 25 ऑक्टोबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. तापसी आणि भूमी दोघांनीही त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तापसीने 'पिंक', 'मुल्क', 'बेबी', 'नाम शबाना' तसेच नुकताच प्रदर्शित झालेला 'बदला' सिनेमात उल्लेखनिय कामगिरी केली. तर भूमीनेही 'दम लगा के हईशा', 'टॉयलेट एक प्रेम कथा' आणि 'शुभ मंगल सावधान' यांसारख्या सिनेमांमध्ये काम केले. आता या दोघींच्याही चाहत्यांना 'सांड की आंख' सिनेमाकडून फार अपेक्षा आहेत.

हा सिनेमा शूटर चंद्रो आणि प्रकाशी तोमर यांच्या आयुष्यावर आधारित आहे. याचवर्षी फेब्रुवारीत बागपत येथे या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. सिनेमातील काही भाग हे हस्तिनापुर आणि मवाना येथे चित्रीत करण्यात आले. सुरुवातीला सिनेमाचं नाव 'वुमनिया' असं ठेवण्यात आलं होतं. मात्र सिनेमाचं टायटल कायदेशीर कचाट्यात अडकलं. 'वुमनिया' या शब्दाचे हक्क प्रीतीश नंदी कम्युनिकेशन यांच्याकडे आहेत. अखेर निर्मात्यांनी सिनेमाचं नाव बदलून 'सांड की आंख' असं ठेवलं.

बॉलिवूडच्या या अभिनेत्याने बायकोला ठेवलं होतं बॉइज हॉस्टेलमध्ये आणि...

Loading...

अदनान सामी म्हणाला, 'मी पाकिस्तानचा द्वेष करत नाही...'

अभिनेत्रीने शेअर केला वॉटर डिलीव्हरीचा लाइव्ह फोटो, हा अनुभव तुम्ही वाचाच!

देशमुख कुटुंबातील गृहकलह चव्हाट्यावर, जेनेलियाने रितेशला दिलं सडेतोड उत्तर

VIDEO: 'बादशहाच्या दरबाराला लाथ मारणारा आमचा राजा होता'; पवारांचा उदयनराजेंना टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 23, 2019 04:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...