बॉलिवूडच्या या अभिनेत्याने बायकोला ठेवलं होतं बॉइज हॉस्टेलमध्ये आणि...

बॉलिवूडच्या या अभिनेत्याने बायकोला ठेवलं होतं बॉइज हॉस्टेलमध्ये आणि...

बॉइज हॉस्टेलमध्ये राहिल्यामुळे हॉस्टेलमधील मुलं शिस्तीत रहात होती. कारण वहिनी कधीही कुठूनही येऊ शकते याची त्यांना भीती होती.

  • Share this:

मुंबई, 23 सप्टेंबर- कपिल शर्माच्या कॉमेडी शो द कपिल शर्मा शोमध्ये स्टार आले आणि त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्यातले किस्से सांगितले नाही असं तर होऊच शकत नाही. या आठवड्याला कपिल शर्माच्या शोमध्ये कवी कुमार विश्वास (Kumar Vishwas) अभिनेते मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) आणि पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) आले होते. आता हे तीन स्टार कपिलच्या शोमध्ये आले आणि धम्माल उडाली नाही असं तर होऊ शकत नाही. कपिलने त्याच्या बोलण्यात पंकजला असं अडकवलं की, पंकज पूर्णपणे अडकला. यानंतर पंकजने त्याच्या लग्नाचा एक धम्माल किस्सा सगळ्यांना सांगितला.

कपिल शोमध्ये सेलिब्रिटींच्या अशा काही गोष्टींबद्दल सांगतो ज्या फक्त ऐकिवात असतात. त्यात किती सत्य आहे की नाही हे फारसं कोणाला माहीत नसतं. यावरूनच कपिलने पंकजला विचारले की, असं म्हंटल जातं की, तुमची पत्नी तुमच्यासोबत बॉइज हॉस्टेलमध्ये रहायची. यावर पंकजने हो असं सरळ उत्तर दिलं.

पंकज पुढे म्हणाला की, 'माझं लग्न लवकर झालं होतं. त्यामुळे मला पत्नीला बॉइज हॉस्टेलमध्ये ठेवावं लागलं होतं. पण ती मुलांसारखी रहायची ही गोष्ट खोटी आहे. हा हे खरंय की ती बॉइज हॉस्टेलमध्ये राहिल्यामुळे हॉस्टेलमधील मुलं शिस्तीत रहात होती. कारण वहिनी कधीही कुठूनही येऊ शकते याची त्यांना भीती होती. एकदा वॉर्डनने मला लक्ष्मी नगर परिसरात घर घ्यायला सांगितलं. पण मी विचार केला की, त्यापेक्षा घरून एखादी गाय मागवावी आणि इथेच रहावं.' त्रिपाठी यांचा हा भन्नाट किस्सा ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

 

View this post on Instagram

 

Tonight in #thekapilsharmashow don’t miss it

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma) on

अदनान सामी म्हणाला, 'मी पाकिस्तानचा द्वेष करत नाही...'

अभिनेत्रीने शेअर केला वॉटर डिलीव्हरीचा लाइव्ह फोटो, हा अनुभव तुम्ही वाचाच!

आमिरच्या लेकीने शेअर केला क्लबमधला बोल्ड फोटो, सोशल मीडियावर होताय तुफान VIRAL

देशमुख कुटुंबातील गृहकलह चव्हाट्यावर, जेनेलियाने रितेशला दिलं सडेतोड उत्तर

VIDEO: 'बादशहाच्या दरबाराला लाथ मारणारा आमचा राजा होता'; पवारांचा उदयनराजेंना टोला

Published by: Madhura Nerurkar
First published: September 23, 2019, 4:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading