नवी दिल्ली, 23 सप्टेंबर- एकीकडे संपूर्ण देशात हाउडी मोदीची (Howdy Modi) चर्चा जोरात सुरू आहे तर दुसरीकडे अदनान सामीचं ट्वीटही लक्ष वेधून घेत आहे. नुकत्याच झालेल्या ‘डॉटर्स डे’च्या निमित्ताने एक ट्वीट केलं होतं. यात त्याने मुलीचा फोटो शेअर केला होता. यावर पाकिस्तानी युझरने कमेन्ट करत म्हटलं की, ‘तुमच्या या पोस्टमध्ये पाकिस्तानविरुद्ध द्वेष नाही हे पाहून आनंद झाला.’ पाकिस्तानी नागरिकाच्या या कमेन्टवर अदनान सामीने आपली रिअॅक्शन दिली. त्या व्यक्तिची कमेन्ट रिट्वीट करत म्हटलं की, ‘माझ्या भावा मी पाकिस्तानचा द्वेष अजिबात करत नाही. मी पाकिस्तानचा द्वेष कसा करू आणि करू तरी का.. पाकिस्तानच्या लोकांनी मला फार प्रेम दिलं. यामुळेच मीही त्यांना ते प्रेम परत देत आहे. मी त्या माणसांचा द्वेष करतो जे गणवेश आणि लाढ्यांच्या जोरावर पाकिस्तानवर राज्य करत आहेत.’
My dear bro, I do NOT hate Pakistan at all. How can I & why would I? The ppl of Pak have given me so much love 4 which I love them back.
— Adnan Sami (@AdnanSamiLive) September 22, 2019
I hate those who’ve ruled Pak wt d khaki ‘danda’ & r responsible 4 d misery inside Pak & wt Pak’s world relations. Our region wants peace.💖🤗 https://t.co/aCVUxDZQl2
अदनान सामीने पुढे लिहिलं की, ‘मी त्या लोकांचा द्वेष करतो जे पाकिस्तानमध्ये होत असलेल्या सर्व गोष्टींना जबाबदार आहेत आणि त्यांच्यामुळे जगभरात पाकिस्तानचे संबंध खराब होत आहेत. आपल्या देशाला शांतीची गरज आहे.’ प्रसिद्ध गायक अदनान सामीने 2016 मध्ये भारतीय नागरिकत्त्व घेतले होते. तेव्हा पासून तो भारतात पत्नी आणि मुलीसोबत राहत आहे. देशमुख कुटूंबातील गृहक्लेश चव्हाट्यावर, जेनेलियाने रितेशला दिलं सडेतोड उत्तर आमिरच्या लेकीने शेअर केला क्लबमधला बोल्ड फोटो, सोशल मीडियावर होताय तुफान VIRAL अभिनेत्रीने शेअर केला वॉटर डिलीव्हरीचा लाइव्ह फोटो, हा अनुभव तुम्ही वाचाच! VIDEO: ‘बादशहाच्या दरबाराला लाथ मारणारा आमचा राजा होता’; पवारांचा उदयनराजेंना टोला