रस्त्याच्या मधोमध चाहत्यावर भडकली तापसी पन्नू, म्हणाली- ‘फोन ठेव नाही तर फोडून टाकेन’

रस्त्याच्या मधोमध चाहत्यावर भडकली तापसी पन्नू, म्हणाली- ‘फोन ठेव नाही तर फोडून टाकेन’

taapsee pannu तापसी पन्नूला बॉलिवूडची दबंग अभिनेत्री म्हणतात. आतापर्यंत तापसीने तिच्या सिनेमांमध्येही अशाच व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 26 जून- तापसी पन्नूला बॉलिवूडची दबंग अभिनेत्री म्हणतात. आतापर्यंत तापसीने तिच्या सिनेमांमध्येही अशाच व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. फक्त सिनेमांमध्येच नाही तर खऱ्या आयुष्यातही तापसी फार निर्भीड आहे. अशावेळी जेव्हा तिच्या चाहत्याने जबरदस्ती तिचा फोटो घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तापसी भडकली आणि त्याला खडेबोल सुनावले.

तापसीने मनमर्झिया सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान तिच्यासोबत घडलेल्या या प्रकाराबद्दल सांगितले. त्याचं झालं असं की तापसी आणि तिची बहीण डिनरला गेले होते. दोघीही ड्रायव्हर गाडी काढण्याची वाट पाहत होते. तेव्हा बाईकवर बसलेला माणूस त्यांचे फोटो काढत होता.

गाडीत बसताना फोटोग्राफर काढत होता दीपिकाचे फोटो, ती म्हणाली, ‘ये आता आत बस...’

 

View this post on Instagram

 

My “that’s it” face P.S- that pinky finger is quite an attention seeker I must say ‍♀️

A post shared by Taapsee Pannu (@taapsee) on

पाकिस्तान कर्णधारासाठी बॉलिवूड आलं एकत्र, सोशल मीडियावर दिल्या प्रतिक्रिया

न विचारता फोटो काढणाऱ्या त्या व्यक्तिचा तापसीला प्रचंड राग आला आणि तिने त्याला भर रस्त्यात सुनावले. फोन खिशात ठेव नाही तर फोडून टाकेन अशी धमकीही दिली. यानंतर तापसी म्हणाली की, अनेकदा सिनेमा करताना कलाकार त्याच व्यक्तिरेखेत राहतात आणि त्याचा परिणाम खऱ्या आयुष्यात होताना दिसतो.

 

View this post on Instagram

 

We all have 2 lives..... the second one starts when we know there is only ONE left.... #FightLikeAGirl #GameOver

A post shared by Taapsee Pannu (@taapsee) on

सलमान खानच्या या अभिनेत्रीने गुपचुप केलं लग्न, लग्नाचे फोटो आले समोर

तापसीच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर नुकताच तिचा गेम ओव्हर हा सिनेमा प्रदर्शित झाला. अश्विन सरवनन दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती एस. शशिकांत यांनी केली आहे. गेम ओव्हर सिनेमानंतर तापसी सांड की आंख सिनेमात दिसणार आहे. तसेच अनुराग कश्यप दिग्दर्शित मनमर्झिया सिनेमातही ती दिसली होती.

राष्ट्रीय महामार्ग क्र. 5वर दरड कोसळली, VIDEO व्हायरल

First published: June 26, 2019, 6:49 AM IST

ताज्या बातम्या