VIDEO: गाडीत बसताना फोटोग्राफर काढत होता दीपिकाचे फोटो, ती म्हणाली, ‘ये आता आत बस...’

VIDEO: गाडीत बसताना फोटोग्राफर काढत होता दीपिकाचे फोटो, ती म्हणाली, ‘ये आता आत बस...’

deepika padukone याआधीही दीपिकाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात एअरपोर्टवर सुरक्षा रक्षकाने तिच्याकडे ओळखपत्र मागितलं होतं.

  • Share this:

मुंबई, 25 जून- सध्या दीपिका पदुकोणचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यातलाच एक एअरपोर्टचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात दीपिका एअरपोर्टवरून बाहेर येते आणि छायाचित्रकार तिचे फोटो काढायला सुरुवात करतात. एअरपोर्टच्या गेटपासून ते तिच्या गाडीपर्यंत छायाचित्रकार तिचा पाठलाग करतात. यावर दीपिका हसत त्या छायाचित्रकारांना ‘या गाडीत बसा…’ असं म्हणते. एअरपोर्टमधून बाहेर पडल्यावर ती छायाचित्रकारांना हसत फोटो देते. पण तिची प्रत्येक छलक टिपता यावी म्हणून छायाचित्रकारही तिच्या पुढे- पुढे जातात. जेव्हा दीपिका गाडीजवळ पोहोचते तेव्हाही तिचे फोटो काढणं थांबत नाही असं दिसल्यावर ती हसत छायाचित्रकारांना गाडीत बसण्याची विनंती करते.

सलमान खानच्या या अभिनेत्रीने गुपचुप केलं लग्न, लग्नाचे फोटो आले समोर

या व्हिडिओमध्ये दीपिकाने सिल्वर रंगाची ट्राइझर आणि पांढऱ्या रंगाचा टॉप घातला होत. तर सिल्वर रंगाचे हिल्स आणि खड्यांचे कानातले घातले होते. दीपिकाचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. अवघ्या १५ तासात या व्हिडिओला २ लाखांहून अधिकांनी पाहिलं आहे.

 

View this post on Instagram

 

#deepikapadukone invites us for a drive ❤❤❤❤😍. #airportdiaries #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

बोटीवर प्रियांकाने निक जोनसला सर्वांसमोर केलं KISS, PHOTO VIRAL

याआधीही दीपिकाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात एअरपोर्टवर सुरक्षा रक्षकाने तिच्याकडे ओळखपत्र मागितलं होतं. सुरक्षा रक्षकाच्या सांगण्यावरून दीपिका मागे वळते आणि ती अगदी शांतपणे त्याला आपलं ओळखपत्र दाखवते. दीपिकाच्या सिनेमाबद्दल बोलायचे तर पुढच्या वर्षी छपाक सिनेमातून ती चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. यात तिच्यासोबत विक्रांत मैसीचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. विशेष म्हणजे या सिनेमाची निर्मितीही दीपिका करत आहे. याशिवाय कपिल देव यांच्या जीवनावर आधारीत ८३ या सिनेमात ती कपिल यांच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्र. 5वर दरड कोसळली, VIDEO व्हायरल

First published: June 25, 2019, 8:29 PM IST

ताज्या बातम्या