• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • TRP मध्ये ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेचा दबदबा कायम, ‘नवऱ्याच्या बायको’ला फटका

TRP मध्ये ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेचा दबदबा कायम, ‘नवऱ्याच्या बायको’ला फटका

काही दिवासंपूर्वीच लोकप्रिय मालिका स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला.

 • Share this:
  मुंबई, 13 मार्च : मराठी मालिकांमध्ये सध्या सगळीकडेच होळीचं सेलिब्रेशन सुरू आहे. त्यामुळे मालिकांच्या टीआरपी मीटरमध्येही नवे चढ-उतार पाहायला मिळले. काही दिवासंपूर्वीच लोकप्रिय मालिका 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र त्याचा प्रभाव टीआरपी रेटिंगवर अद्याप दिसून येत आहे. या आठवड्याचं टीआरपी रेटिंग समोर आलं असून यामध्ये टॉप 5 या झी मराठीच्याच मालिका आहेत. 2 आठवड्यापूर्वी संपलेल्या 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेचा प्रभाव या आठवड्याच्या रेटिंगवर पडला आहे. ही मालिका रेटींगमध्ये या आठवड्यातही पहिल्या स्थानावर कायम राहिली आहे. तर मागच्या काही आठवड्यांपासून अव्वल ठरलेल्या 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेच्या रेटिंगमध्ये मात्र घसरण झाली आहे. ‘...तर कंगना अभिनय करणं सोडून देईल’ रंगोली चंडेलचं बॉलिवूडकरांना ओपन चॅलेंज
  सतत्यानं टीआरपी रेटींगमध्ये अव्वल असलेली 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मलिका या चौथ्या क्रमांकावर घसरली आहे. या मालिकेत सध्या गुरुनाथ मायाच्या मदतीनं राधिकाला त्रास देत आहे. त्यासाठी तो वेगवेगळे प्लान करताना दिसत आहे. मात्र तरीही राधिका त्याला मात देण्यात यशस्वी ठरते. Corona Positive अभिनेत्यानं शेअर केला पहिला फोटो, सांगितलं कसा देत आहेत लढा
  'अग्गबाई सासूबाई' ही मालिका टीआरपी रेटिंगमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेत सध्या एकिकडे अभिजित-आसावरी एकमेकांना समजून घेत संसार करताना दिसत आहे. तर दुसरीकडे आसावरीचा मुलगा या दोघांना वेगळं करण्याच्या मागे लागला आहे. त्यासाठी तो प्रज्ञासोबत मिळून वेगवेगळी कारस्थान रचताना दिसत आहे. 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेनं पुन्हा एकदा टॉप 5 मध्ये स्थान मिळवलं असून ही मालिका 5 व्या स्थानावर आहे. तर सर्वांना खळखळून हसवणारा 'चला हवा येऊ द्या' सेलिब्रेटी पॅटर्न हा रिअलिटी शो दुसऱ्या स्थानावर कायम आहे. धावणाऱ्या हत्तीवर निर्दयीपणे चालवली गोळी, VIRAL VIDEO पाहून भडकला रणदीप हुड्डा
  Published by:Megha Jethe
  First published: