Home /News /viral /

धावणाऱ्या हत्तीवर निर्दयीपणे चालवली गोळी, VIRAL VIDEO पाहून भडकला रणदीप हुड्डा

धावणाऱ्या हत्तीवर निर्दयीपणे चालवली गोळी, VIRAL VIDEO पाहून भडकला रणदीप हुड्डा

मनोरंजन म्हणून खरंच लोक अशा पद्धतीनं प्राण्यांची हत्या करतात? रणदीप हुड्डाचा संतापजनक सवाल

    मुंबई, 13 मार्च : बॉलिवूडचा सुपरस्टार रणदीप हुड्डा (Randeep Hooda) त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ खूपच धक्कादायक आहे. या व्हिडीओवर रणदीप हुड्डाने राग व्यक्त केला आहे. प्राण्यांसोबत अशा निर्दयीपणे कृत करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी अशी मागणी त्याने या व्हिडीओच्या कॅप्शनमधून केली आहे. रणदीपचं प्राणी प्रेम पाहून युझर्सही भावुक झाले आहेत. या व्हिडीओमध्ये एका जिपमध्ये दोन तरुण बसले आहेत. जे समोरून येणाऱ्या हत्तीची शिकार करत आहेत. हत्तीच्या या शिकारीचा व्हिडीओ रणदीपनं आपल्या अकाऊंटवर शेअर केला आहे. प्राण्यांची अशी हत्या करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी अभिनेता रणदीपने केली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. 16 तासांपूर्वी हा व्हिडीओ ट्वीट करण्यात आला होता. त्याच्या या ट्वीटवर तुफान कमेंट्स आल्या आहेत. असं कसं होऊ शकतं? मजेसाठी खरंच लोक अशा पद्धतीची प्राण्यांची हत्या करतात? या प्रकरणी कर्नाटक वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तातडीनं कारवाई करावी अशी मागणी केली आहे. त्याच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर अनेक युझर्सनी या व्हिडीओवर संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ 4 हजारहून अधिक लोकांनी रिट्वीट केला आहे. 8.9 लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. हे वाचा-पिल्लासाठी इवलासा जीव असलेल्या खारीनं कोब्य्राशी घेतला पंगा, पाहा VIDEO या व्हिडीओच्या कमेंटमध्ये एका युझरने कमेंट केली आहे. हा व्हिडीओ 7 मार्चचा आहे. गोळी चालवणाऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यासोबत हा व्हिडीओ कोणी काढला होता याची चौकशी सुरू आहे. बंदुकीतून सुटलेली गोळी हत्तीला नाही बॅरिकेटला लागली असल्याचं या युझरने म्हटलं आहे. हा व्हिडीओ कर्नाटकातील असल्याची माहिती मिळत आहे. हे वाचा-चुकून स्पीड वाढला आणि तरुणीकडून घडला भयंकर स्टंट, पाहा VIDEO
    Published by:Akshay Shitole
    First published:

    पुढील बातम्या