मुंबई, 13 मार्च : बॉलिवूड क्वीन कंगना रणौत आज इंडस्ट्रीमधील सर्वाधिक यशस्वी अभिनेत्री आहे. कोणत्याही अभिनेत्याशिवाय सिनेमा कसा हिट करावा हे शिकावं तर कंगनाकडूनच. पण कंगना आणि वाद हे समीकरण सुद्धा आता नवीन नाही. जेव्हा जेव्हा कंगनाचं नाव घेतलं जातं तेव्हा तेव्हा कोणत्यातरी नव्या वादाला तोंड फुटतं. पण परिस्थिती कशीही असली तरीही एक व्यक्ती मात्र सतत तिच्या पाठीशी असलेली दिसून येते ती म्हणजे तिची बहीण रंगोली चंडेल. ती अनेकदा ट्विटरच्या माध्यमातून बॉलिवूडच्या इतर कलाकारांवर टीका करताना दिसते. आताही असंच काहीसं घडलं आहे आणि रंगोलीनं संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीला ओपन चॅलेंज देऊन टाकलं आहे. रंगोली चंडेलनं नुकतंच एक ट्वीट केलं आहे. ज्यात तिनं बॉलिवूडला ओपन चॅलेंज दिलं आहे. रंगोलीनं तिच्या ट्वीटमध्ये लिहिलं, संपूर्ण इंडस्ट्रीला माझं ओपन चॅलेंज आहे. जर एकही बॉलिवूड अभिनेत्री फक्त स्वबळावर कोणत्याही अभिनेत्याच्या मदतीशिवाय एक बिग बजेट सिनेमा हिट करुन दाखवावा. जर कोणीही हे करुन दाखवलं तर कंगना अभिनय करणं सोडून देईल. धावणाऱ्या हत्तीवर निर्दयीपणे चालवली गोळी, VIRAL VIDEO पाहून भडकला रणदीप हुड्डा
रंगोलीनं घेतली अहमद खानशी टक्कर रंगोलीनं हे ट्वीट विनाकारण केलेलं नाही. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत बागी 3 चे दिग्दर्शक अहमद खान यांनी एक वादग्रस्त विधान केलं होतं. या मुलाखतीत त्यांनी कंगनाच्या मणिकर्णिका सिनेमामध्ये बरीच मोठी रक्कम गुंतवूनही खूप मोठं नुकसान सहन करावं लागल्याचं म्हटलं होतं. अहमद खान यांच्या या वक्तव्यानंतर रंगोलीनं त्यांना सडेतोड उत्तर दिलं. बागी 3नं पहिल्या आठवड्यात 49 कोटींचा गल्ला जमवला तर मणिकर्णिकानं 45 कोटी. रंगोलीनं या गोष्टीवर नाराजी व्यक्त करत ज्या सिनेमानं 150 कोटींपेक्षा जास्त कमाई केली तो सिनेमा फ्लॉफ कसा काय असा थेट सवाल केला आहे. सासू पडली सुनेवर भारी! समीरा रेड्डीचा डान्स Video ची सोशल मीडियावर होतेय चर्चा
रंगोलीनं संपूर्ण इंडस्ट्रीला टार्गेट करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा तिनं करण जोहरवर सुद्धा निशाणा साधला आहे. करण जोहरचा आगामी सिनेमा ‘तख्त’वरही तिनं तिखट शब्दात टीका केली होती. कंगानाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर ती लवकरच जयललिता यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. हा घ्या पुरावा! चाहत्यांना रिप्लाय देण्याच्या बदल्यात कार्तिक आर्यन घेतो पैसे