मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Corona Positive अभिनेत्यानं शेअर केला पहिला फोटो, सांगितलं कसा देत आहेत लढा

Corona Positive अभिनेत्यानं शेअर केला पहिला फोटो, सांगितलं कसा देत आहेत लढा

हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता टॉम हँक्स आणि त्यांची पत्नी रिटा विल्सन यांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांनी गुरुवारी सकाळी याबद्दल सोशल मीडियावरुन माहिती दिली होती.

हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता टॉम हँक्स आणि त्यांची पत्नी रिटा विल्सन यांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांनी गुरुवारी सकाळी याबद्दल सोशल मीडियावरुन माहिती दिली होती.

हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता टॉम हँक्स आणि त्यांची पत्नी रिटा विल्सन यांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांनी गुरुवारी सकाळी याबद्दल सोशल मीडियावरुन माहिती दिली होती.

  • Published by:  Megha Jethe
मुंबई, 13 मार्च : जगभरात सध्या कोरोना व्हायरसनं अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. जिथे पाहावं तिथे फक्त एकच चर्चा आहे ती म्हणजे कोरोना व्हायरसची. या दरम्यान काही सेलिब्रेटींना सुद्धा या व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता टॉम हँक्स आणि त्यांची पत्नी रिटा विल्सन यांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांनी गुरुवारी सकाळी याबद्दल सोशल मीडियावरुन माहिती दिली होती. त्यानंतर आता टॉम यांनी त्यांची पत्नी रिटासोबतचा फोटो शेअर करत ते दोघंही या आजाराशी कसा लढा देत आहेत हे चाहत्यांना सांगितलं आहे. टॉम हँक्स यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक खूपच सकारात्मक फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल. टॉम आणि रिटा कोरोना पॉझिटिव्ह आहे. मात्र तरीही या फोटोमध्ये हे दोघंही हसताना दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये टॉम यांनी खूपच प्रेरणादायी मेसेज दिला आहे. टॉम यांनी लिहिलं, ‘हॅलो फ्रेंड्स, रिटा आणि मी तुम्ही व्यक्त केलेल्या काळजीसाठी धन्यवाद देतो. आम्ही दोघंही Covid-19 पॉझिटीव्ह आहोत आणि आम्हाला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. ज्यामुळे हा व्हायरल इतर लोकांपर्यंत पोहोचणार नाही. सर्वांनी काळजी घ्या घाबरून जाऊ नका. डॉक्टरांचा सल्ला पाळा. स्वतःची आणि आजूबाजूच्या लोकांची काळजी घ्या ज्यामुळे तुम्ही यातून सुखरुप बाहेर पडू शकाल. आम्ही सुद्धा हळूहळू ठिक होत आहोत.’ सासू पडली सुनेवर भारी! समीरा रेड्डीचा डान्स Video ची सोशल मीडियावर होतेय चर्चा
टॉम हँक्स यांनी त्यांच्या या इन्स्टाग्राम पोस्टमधून त्यांच्या सर्व चाहत्यांना सतर्क राहाण्याचा तसेच पॅनिक न होण्याचा सल्ला दिला आहे. त्यांची ही पोस्ट सध्याच्या परिस्थितीत सर्वांसाठीच खूप प्रेरणादायी आहे. जेव्हा त्यांनी कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती तेव्हापासून त्यांचे चाहते चिंतेत होते. मात्र त्यांच्या हसरा चेहरा पाहिल्यावर सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. सर्वजण ते लवकर ठिक व्हावेत अशी प्रार्थना करत आहेत. हा घ्या पुरावा! चाहत्यांना रिप्लाय देण्याच्या बदल्यात कार्तिक आर्यन घेतो पैसे टॉम यांनी यासंदर्भात एक ट्वीटही केलं होतं. ते म्हणाले, आम्ही दोघं ऑस्ट्रेलियाला गेले होतो, त्यानंतर आम्हाला ताप आला आणि अंगही दुखायला लागलं होतं. त्यानंतर आम्ही कुठलाही वेळ न घालवता टेस्ट करून घेतली. त्यानंतर ती पॉझिटीव्ह निघाली. आता आम्ही कोरानासाठी तयार केलेल्या खास वॉर्डमध्ये आहोत. उपचार सुरु आहेत. निष्काळीपणा न करता काही लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरकडे जा आणि टेस्ट करा असला सल्लाही त्यांनी दिला. टॉम यांचा सुपरहिट सिनेमा 'फॉरेस्ट गम्प'चा बॉलिवूड रिमेक 'लाल सिंह चढ्ढा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून यात आमिर खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘5 मुलांना डेट करणं हा तिचा स्वतःचा निर्णय’, बिनधास्त वक्तव्यामुळे फसली नेहा
First published:

Tags: Hollywood

पुढील बातम्या