जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / सावरकरांच्या भूमिकेसाठी रणदीपने घटवलं तब्बल 26 किलो वजन; निर्माते म्हणाले '4 महिने त्याने फक्त एक खजूर...'

सावरकरांच्या भूमिकेसाठी रणदीपने घटवलं तब्बल 26 किलो वजन; निर्माते म्हणाले '4 महिने त्याने फक्त एक खजूर...'

 अभिनेता रणदीप हुडा त्याच्या आगामी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

अभिनेता रणदीप हुडा त्याच्या आगामी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचे कथानक विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित आहे.हा चित्रपट का बनवला गेला आणि रणदीप हुडाने या भूमिकेसाठी कशी मेहनत घेतली याचा खुलासा निर्मात्यांनी केला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 29 मे : बॉलिवूड अभिनेता रणदीप हुडा त्याच्या आगामी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची काल जयंती होती. याच दिवसाचे निमित्त साधत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. यात अभिनेता रणदीप हुडा ‘वीर सावरकरां’ची भूमिका साकारत आहे. या सिनेमात तो केवळ अभिनय करत नाहीये.  तर दिग्दर्शन देखील करत आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचे कथानक विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः रणदीप हुडाने केलं असून निर्मिती आनंद पंडित यांनी केली आहे. हा चित्रपट का बनवला गेला आणि रणदीप हुडाने या भूमिकेसाठी कशी मेहनत घेतली याचा खुलासा निर्मात्यांनी केला आहे. टीझर पाहून रणदीपने सावरकरांच्या भूमिकेत चपखल बसण्यासाठी प्रचंड मेहनत घेतल्याचं दिसून येत आहे. आता रणदीपने एक दोन नाही तर  26 किलो वजन कमी केल्याचे वृत्त आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी रणदीप हुडाने स्वतःचे वजन कसे कमी केले याचा खुलासा केला आहे. एका वेब पोर्टलशी खास बातचीत करताना आनंद पंडित यांनी सांगितले की, ते वीर सावरकरांच्या चरित्राचा खूप दिवसांपासून अभ्यास करत आहेत. वीर सावरकर राजकारणाचे बळी ठरले आणि त्यांचे हक्क मिळाले नाहीत असं अभ्यासातून समजल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणदीप हुडाने या भूमिकेसाठी 18 किलो वजन कमी केल्याची माहिती होती. हा प्रश्न आनंद पंडित यांना विचारला असता ते म्हणाले, ‘या भूमिकेसाठी रणदीपने 18 नाही तर 26 किलो वजन कमी केले आहे. जेव्हा तो माझ्या ऑफिसमध्ये आला तेव्हा त्याचे वजन 86 किलो होते. त्या दिवसापासूनच तो या व्यक्तिरेखेत उतरू लागला आणि आजपर्यंत तसाच आहे. त्याला या भूमिकेत कोणतीही कसर सोडायची नव्हती. त्याने 4 महिने फक्त एक खजूर आणि एक ग्लास दूध प्यायले. शूटिंग संपेपर्यंत. एवढेच नाही तर कोणतेही नकली केस न वापरता त्याने त्याचे स्वतःचे केस देखील कापले.’ असं त्यांनी सांगितलं आहे. सलमानसोबत घेतला पंगा; त्या घटनेनंतर दबंग’ च्या दिग्दर्शकाचं उद्ध्वस्त झालं करिअर; आता जगतोय असं आयुष्य आनंद पंडित म्हणाले, ‘रणदीप हुड्डाने ही भूमिका साकारताना कोणतेही प्रोस्थेटिक वापरले नाही. आम्ही महाबळेश्वर जवळच्या गावात शूटिंग केलं. माझ्याकडे येण्यापूर्वी रणदीपने या सिनेमासाठी वीर सावरकरांच्या नातवाकडून परवानगी घेतली होती. पण परवानगीची गरज होती असे मला वाटत नाही. कारण सर्व माहिती पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहे. उद्या गांधीजींवर चित्रपट काढला तर परवानगी लागणार नाही.’

जाहिरात

या चित्रपटाच्या निर्मितीबाबत ते म्हणाले, ‘एके दिवशी संदीप सिंह आणि रणदीप हुडा त्यांच्या कार्यालयात आले आणि त्यांनी वीर सावरकरांवर बायोपिक बनवण्याबाबत चर्चा केली. त्यांनी योग्य वाटल्यास मी सह-निर्माता म्हणून सहभागी होऊ शकतो, असेही सांगितले. अशा प्रकारे मी  या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला.’ असं त्यांनी सांगितलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात