जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / सलमानसोबत घेतला पंगा; त्या घटनेनंतर दबंग' च्या दिग्दर्शकाचं उद्ध्वस्त झालं करिअर; आता जगतोय असं आयुष्य

सलमानसोबत घेतला पंगा; त्या घटनेनंतर दबंग' च्या दिग्दर्शकाचं उद्ध्वस्त झालं करिअर; आता जगतोय असं आयुष्य

सलमानसोबतच भांडण या दिग्दर्शकाला पडलं महागात

सलमानसोबतच भांडण या दिग्दर्शकाला पडलं महागात

बॉलिवूडचा एक असा दिग्दर्शक ज्याला नाव आणि काम दोन्ही मिळालं, पण आज त्याला विस्मृतीत जगायला भाग पाडलं आहे. कोण आहे हा दिग्दर्शक ज्याने सलमानचे नशीब चमकवले, पण तो स्वतःच कुठेतरी अंधारात हरवून गेला. याचं कारण होतं बॉलिवूडचा भाईजान. काय घडलं नक्की या दिग्दर्शकासोबत जाणून घ्या.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 28 मे : बॉलीवूडमध्ये ‘दबंग भाईजान’ म्हणजेच सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाशी कोणी भिडलं तर त्याची हिट कारकीर्द बुडणार हे नक्की असं म्हटलं जातं. आतापर्यंत अनेक उदाहरणे बी-टाऊनमध्ये आहेत.बॉलीवूडच्या या जगात कोण कधी हिट होईल आणि कसा फ्लॉप होईल हे सांगणं अवघड आहे. इथे यशस्वी होण्यासाठी तुमच्यात कौशल्य असणं तर आवश्यक आहेच पण त्यासाठी कोण्या एका व्यक्तीच्या मागेपुढे नेहमीच करावं लागतं. त्याच्या सांगण्यानुसार वागावं लागतं. आणि त्याच्या विरोधात तुम्ही गेलात तर तुमचं करिअर संपलंच म्हणून समजा. असाच किस्सा एका प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या भावाचा आहे. हा दिग्दर्शक स्वतः इंडस्ट्रीतील प्रसिद्ध असला तरी  त्याच्या भावाला मात्र नाव कमावता आलं नाही. याचं कारण होतं बॉलिवूडचा भाईजान. काय घडलं नक्की या दिग्दर्शकासोबत जाणून घ्या. बॉलिवूडचा एक असा दिग्दर्शक ज्याला नाव आणि काम दोन्ही मिळालं, पण आज त्याला विस्मृतीत जगायला भाग पाडलं आहे. कोण असा दिग्दर्शक आहे ज्याने सलमानचे नशीब चमकवले, पण तो स्वतःच कुठेतरी अंधारात हरवून गेला. हा दिग्दर्शक म्हणजे अनुराग कश्यपचा भाऊ अभिनव कश्यप. याच दिग्दर्शकाने सलमान खानला ‘चुलबुल पांडे’ बनवून घराघरात ओळख दिली. अभिनव कश्यप बऱ्याच दिवसांपासून चित्रपटसृष्टीतून गायब आहे. बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर अभिनवने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली, ज्यामुळे बराच गदारोळ झाला होता.

News18लोकमत
News18लोकमत

अभिनव कश्यपने 2000 साली संजय दत्तच्या ‘जंग’ या चित्रपटाची पटकथा लिहिली होती. यानंतर त्याने ‘पांच’ आणि ‘युवा’ सारख्या चित्रपटांसाठी काम केले. अभिनव कश्यपने ‘मनोरमा’ आणि ‘13B’ सारख्या चित्रपटांसाठी संवादही लिहिले आहेत. पण 2010 साली ज्यासाठी तो इंडस्ट्रीत आला होता ती ओळख त्याला मिळाली. सलमान खान, ज्याने त्याच्या कारकिर्दीत सुमारे 20 फ्लॉप चित्रपट दिले होते, अभिनव त्याच्यासाठी देवदूत म्हणून आला आणि त्याने दबंग चित्रपटाचे दिग्दर्शन केले. हा चित्रपट भाईजानच्या कारकिर्दीतील चौथा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आणि त्यानंतर त्याने एकापाठोपाठ 5 ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. SwatantryaVeer Savarkar Teaser: ‘गांधींनी अहिंसेचा विचार मांडला नसता तर…’ स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचा जबरदस्त टीझर रिलीज दबंग चित्रपटानंतर 2013 मध्ये अभिनव कश्यपने रणबीर कपूरसोबत ‘बेशरम’ चित्रपट बनवला. पण हा चित्रपट पडद्यावर पडला. फ्लॉप ठरलेल्या या चित्रपटानंतर अभिनव कश्यप पुन्हा कोणत्याही मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसला नाही. दिग्दर्शक अभिनव कश्यपने सलमान खानवर दादागिरी केल्याचा आरोप केला आहे. यासोबतच सलमानने आपलं करिअर बरबाद करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केल्याचेही त्याने सांगितले. अभिनवने आरोप केला होता की सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाने त्याचे प्रोजेक्ट्स थांबवण्यासाठी आणि त्याचे चित्रपट फ्लॉप करण्यासाठी अनेक डावपेचांचा अवलंब केला होता. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्याही सतत देत होत्या. आणि जेव्हा तो एफआयआर नोंदवण्यासाठी पोलिस स्टेशनला पोहोचला तेव्हा त्याची तक्रार नोंदवण्यात आली नाही. या विषारी बॉलिवूडचा प्रमुख म्हणून त्याने सलमान खानच्या कुटुंबाचे वर्णन केले होते. अभिनव कश्यपचा सलमान खान आणि त्याचा भाऊ अरबाज खान यांच्याशी २०२० मध्ये वाद झाला होता, ज्यामध्ये त्याने अभिनेत्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप केला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात