VIDEO- बॉल पूलमध्ये फसली Sushmita Sen, बॉयफ्रेंड रोहमन शॉलने अशी केली मदत

VIDEO- बॉल पूलमध्ये फसली Sushmita Sen, बॉयफ्रेंड रोहमन शॉलने अशी केली मदत

ती पूलमध्ये पडते आणि काही वेळ बॉल पूलच्या आतच राहते. तिच्या दोन्ही मुली तिला शोधतात. ती त्यांना दिसते पण सुश्मिताला पूलमधून बाहेर येताच येत नाही.

  • Share this:

मुंबई, 05 जुलै- बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन सध्या आपल्या दोन्ही मुलींसोबत आणि प्रियकर रोहमन शॉलसोबत दुबईमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. सोशल मीडियावर तिने त्यांच्या सुट्ट्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यातीलच एका शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती पूलमध्ये पडते आणि काही वेळ बॉल पूलच्या आतच राहते. तिच्या दोन्ही मुली तिला शोधतात. ती त्यांना दिसते पण सुश्मिताला पूलमधून बाहेर येताच येत नाही.

यानंतरच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये रोहमनही पूलमध्ये पडतो. सुश्मिता स्वतःला त्या पूलमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते. पण ती जेवढा प्रयत्न करते तेवढी ती आत अडकत जाते. शेवटी रोहमन तिच्या हाताला धरून तिला बाहेर काढतो.

 

View this post on Instagram

 

😅😎😅 Haven’t had this much fun in a while, Thank you Alisah for indulging us!!!😄😍👏💃🏻❤️ #sharing #happiness #fun #familytime #playroom #home #dubai @rohmanshawl 😁💋I love you guys!!! 💃🏻 #duggadugga

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47) on

सुश्मिताने हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘गेल्या काही काळात मी एवढी मजा कधीच केली नव्हती. आम्हाला इथे आणण्यासाठी अलीशा तुझे आभार.’ सुश्मिता सोशल मीडियावर फार सक्रीय असते. ती अनेकदा तिचे आणि संपूर्ण कुटुंबाचे अनेक फोटो शेअर करत असते. सुश्मिताचा प्रियकर रोहमन तिच्यापासून वयाने फार लहान आहे. दोघांची ओळख सोशल मीडियावरच झाली होती. रोहमन सुश्मिताचा कट्टर चाहता आहे. सुश्मिताच्या कौतुकाने सुरू झालेला त्यांचा संवाद अखेर प्रेमावर येऊन थांबला.

स्वप्नील- अमृताच्या पावलांवर पाऊल ठेवत कुणालने केलं धम्माल Bottlecapchallenge

Bigg Boss Marahi 2- आपण कितीही केलं तरी यांचीच नावं पुढे- सुरेखा पुणेकर

बिग बॉस विजेत्या अभिनेत्याच्या भावाचा बुडून मृत्यू

VIDEO:आदेश बांदेकरांनी घेतलं माऊलीचं दर्शन, टाळ-मृदंगात केला हरिनामाचा गजर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 5, 2019 07:38 PM IST

ताज्या बातम्या