या व्हिडीओतून त्याच्यातील आणखी एक टॅलेंट सर्वांसमोर आलं आहे. एकाच व्यक्तीमध्ये इतक्या कला, इतके गुण कसे काय असू शकतात असा प्रश्न प्रत्येकाला पडेल. सुशांतचे याधीचे व्हिडीओ पाहिल्यानंतर तो फक्त टॅलेंटडच नाही तर मल्टिटॅलेडेट होता हे दिसून येतं आहे. आणि अशा मल्टि टॅलेंटड अभिनेत्याच्या आत्महत्येमुळे नेटिझन्स बॉलीवूडवर निशाणा साधत आहेत. हे वाचा - सुशांतच्या अभिनयाबद्दल दीपिकानं केलं होतं मोठं वक्तव्य, पाहा VIDEO 14 जूनला सुशांत सिंह राजपूतने मुंबईतील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. अभिनयाचं क्षेत्रात येण्यासाठी त्याने इंजीनिअरिंगही सोडलं. सुरुवातीला बॅकग्राऊंड डान्सर म्हणून त्याने या क्षेत्रात आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यानंतर पवित्र रिश्ता सारख्या मालिकेतून तो खूप प्रसिद्ध झाला. यानंतर 'काय पो छे' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्येही त्याने एंट्री केली. त्यानंतर 'धोनीः द अनटोल्ड स्टोरी', 'केदारनाथ', 'छिछोरे' अशा फिल्म त्याने केल्या. संपादन - प्रिया लाड हे वाचा - अखेर सोनम कपूरने नेपोटिझमवर दिलं उत्तर; वडिलांचा दाखला देत व्यक्त केली भावनाSushant was an Ambidextrous,he could mirror write as well. Something that even Leonardo da Vinci would do,here he can be seen writing "Tahir Bhasin" using the same skill. pic.twitter.com/XMwEZv3hpL
— siddhant. (@ignoreandfly) June 19, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.