मुंबई, 21 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये नेपोटिजमविषयी मोठी चर्चा सुरू आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी याविरोधात आवाज उठवला आहे. यामध्ये अनिल कपूरची मुलगी सोनम कपूर हिलाही सोशल मीडियावर ट्रोल केले गेले. सोनम कपूर सोशल मीडियावर इतकी ट्रोल झाली की ती सध्या खूप अस्वस्थ झाली आहे. यानंतर तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरील कमेंट सेक्शन बंद केले. आता सोनम कपूरने एका ट्विटमध्ये ट्रोलला प्रत्युत्तर दिले आहे. सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर सोशल मीडियावरील त्याच्या चाहत्यांनी बॉलिवूड स्टारकिड्सवर संताप व्यक्त केला. काही चित्रपट निर्माते इंडस्ट्रीबाहेरील लोकांना काम करण्याची संधी कमी देतात, असा आरोप केला जात आहे. आता फादर डेच्या निमित्ताने सोनम कपूरने या प्रकरणात आपली बाजू मांडली आहे. मला त्यांची मुलगी असल्याचा अभिमान आहे सोनम कपूर हिने ट्वीट करून लिहिले की, ‘आज फादर्स डे वर मला एक गोष्ट सांगायची आहे. हो मी माझ्या वडिलांची मुलगी आहे आणि हो मी त्यांच्यामुळे येथे आहे. आणि हे माझे भाग्य आहे. हा काही अनादर नाही.. माझ्या वडिलांनी मला हे सर्व देण्यासाठी खूप कष्ट केले आहेत. आणि हे माझं कर्म आहे, जिथे मी जन्मले आणि ज्यांच्या पोटी जन्मली, मला त्याची मुलगी असल्याचा अभिमान आहे.
Today on Father’s Day id like to say one more thing, yes I’m my fathers daughter and yes I am here because of him and yes I’m privileged. That’s not an insult, my father has worked very hard to give me all of this. And it is my karma where I’m born and to whom I’m born. I’m proud
— Sonam K Ahuja (@sonamakapoor) June 21, 2020
सोनम कपूर म्हणाली, मी सुशांतला ओळखत नाही याच कारणास्तव सुशांतच्या चाहत्यांनी सोनम कपूरलाट्रोल केले होते. एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार शेअर केला जात आहे. यात सोनम कपूर करण जोहरला सुशांतसिंग राजपूत माहित नसल्याचे सांगत आहे. हा व्हिडीओ शेअर करून सुशांतच्या चाहत्यांनी सोनमला सोशल मीडियावर वाईट पद्धतीने ट्रोल केले आहे. हे वाचा- सुशांतकडून निसटलेले चित्रपट मिळाले होते या खास अभिनेत्याला, 3 टीम करत आहेत तपास