Home /News /entertainment /

सुशांतच्या अभिनयाबद्दल दीपिकानं केलं होतं मोठं वक्तव्य, ती काय म्हणाली; पाहा VIDEO

सुशांतच्या अभिनयाबद्दल दीपिकानं केलं होतं मोठं वक्तव्य, ती काय म्हणाली; पाहा VIDEO

दीपिकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात सुशांतच्या अभिनयाबाबत दीपिकानं आपलं मत व्यक्त केलं होतं.

    मुंबई, 21 जून : सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. 14 जूनला सुशांतनं त्याच्या मुंबईतल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर सोशल मीडियावर नेपोटिझमचा वाद उभा राहिला आणि त्यानंतर आता सुशांतचे अनेक थ्रोबॅक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. असाच दीपिकाचा सुद्धा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात सुशांतच्या अभिनयाबाबत दीपिकानं आपलं मत व्यक्त केलं होतं. सुशांतच्या फॅनपेजवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ दीपिकाच्या एका जुन्या मुलाखतीचा आहे. जिथे तिला विचारण्यात आलं होतं की, परफॉर्मन्ससाठी तू कोणत्या अभिनेत्याला सर्वाधिक रेटिंग देशील. त्यावर दीपिका सुशांतचं नाव घेते आणि सांगते, मला सुशांत सिंह राजपूतचा अभिनय खूप आवडतो.
    दीपिकानं 2017 मध्ये सुशांतच्या राब्ता सिनेमात स्पेशल आयटम साँग केलं होतं. या सिनेमात कृती सेनन आणि सुशांत यांच्या प्रमुख भूमिका होत्या. याशिवाय दीपिका अनेकदा सुशांतसोबत पार्टीमध्ये पोझ देताना दिसली होती. सुशांतनं त्याच्या छोट्या करिअरच्या काळात सुद्धा स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख तयार केली होती. करिअरच्या सुरुवातीच्या काळत त्यानं बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलं होतं. सुशांतनं त्याच्या अभिनय करिअरची सुरुवात 2009 मध्ये पवित्र रिश्ता या मालिकेतून केली होती. त्यानंतर 2013 मध्ये 'काय पो छे' या सिनेमातून त्यानं बॉलिवूड पदार्पण केलं. त्यानंतर त्यानं ‘शुद्ध देसी रोमांस', ‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी', ‘राबता', ‘केदारनाथ' और ‘सोनचिड़िया' या सारख्या सिनेमात काम केलं.
    First published:

    Tags: Bollywood, Deepika padukone, Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या