आशिष सिंग मुंबई, 16 जून : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी बॉलिवूडमधील काही कलाकारांनी या आत्महत्येला सिनेसृष्टीतल्या काही मंडळींना जबाबदार धरत आरोप केले आहेत. या आरोपांची दखल काल गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही घेतली आणि पोलीस सर्व बाजूंनी चौकशी आणि तपास करतील, असं सांगितलं होतं. त्यानुसार पोलिसांनी सुशांतच्या दोन्ही बहिणींचे दुसऱ्यांदा जबाब नोंदवले आहेत.
सुशांतच्या काही चाहत्यांनी आणि कंगना रानौट, अभिनव कश्यप यांच्यासारख्या कलाकारांनी थेट नेपोटिझमचे आरोप केले आहेत. आणि याच कारणामुळे सुशांतने शेवटचं पाऊल उचललं असं म्हटलं आहे. सिनेसृष्टीत कुणी ओळखीचं नव्हतं म्हणून मुद्दाम सुशांतला एकटं पाडलं गेलं, त्याच्याकडचे सिनेमे काढून घेतले गेले असे थेट आरोप होत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपांमधलं तथ्य तपासण्याचं काम सुरू आहे. त्यासाठी चौकशी सुरू आहे. सुशांतच्या मॅनेजरची याप्रकरणी चौकशी केली जाईल. या चौकशीतून यावर काही प्रकाश पडला तर पुढच्या तपासाची दिशा ठरवण्यात येईल, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं.
रिया चक्रवर्तीनं 'या' कारणामुळे घाबरुन सोडलं होतं सुशांतचं घर, आता झाला खुलासा
सुशांतची मैत्रीण आणि त्याच्याबरोबर काही काळ राहणारी रिया चक्रवर्ती हिचीसुद्धा चौकशी केली जाणार आहे.
पोलिसांनी आतापर्यंत सुशांत आत्महत्याप्रकरणी 9 जणांचे जबाब नोंदवले आहेत. त्यामध्ये सुशांतच्या कुटुंबीयांचा समावेश आहे. त्याच्या दोन बहिणी, वडील आणि क्रिएटिव्ह मॅनेजर सिद्धार्थ पीठानी यांच्यासह घरातच राहणारा केअर टेकर दीपेश सावंत यांची स्टेटमेंट घेण्यात आली आहेत.
अन्य बातम्या
दिग्दर्शक अभिनव कश्यपनं सलमान खानवर केले गंभीर आरोप, भाऊ अनुराग म्हणतो...
VIDEO - सुशांतच्या मृत्यूमुळे EX गर्लफ्रेंडला धक्का; अशी झाली अंकिताची अवस्था
सुशांतची जवळची मैत्रिण रिया चक्रवर्ती पोहोचली कूपर रुग्णालयात, PHOTOS आले समोर