मुंबई, 16 जून : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे बॉलिवूड कलाकाराचं संघर्षमय जीवन पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. या इंडस्ट्रीमधल्या अनेकांनी इंडस्ट्रीमध्ये दिल्या जाणाऱ्या क्रूर वागणुकीबाबत भाष्य केलं आहे. काल कंगना रणौतनं आपल्या व्हिडीओमध्ये सुशांतच्या आत्महत्येला बॉलिवूडमध्ये असलेलं नेपोटिझम कारभूत असल्याचं म्हटल्यानंतर आता दिग्दर्शक अभिनव कश्यप यांनीही त्याच्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात त्यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची निपक्षपाती चौकशी करण्याची मागणी करत सलमान खान आणि त्याच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले होते. YRF सारख्या एजन्सींनीच सुशांतला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. यावर आता त्यांचा भाऊ अनुराग कश्यपनं आपली प्रतिक्रिया दिली आहे. अभिनव यांच्या फेसबुक पोस्टनंतर सोशल मीडियावर अनुराग कश्यपला अनेकांनी त्याचं यावर काय मत आहे अशी विचारणा केली होती. यावर उत्तर देताना अनुरागनं एक ट्वीट केलं आहे. त्यानं लिहिलं, मला मीडियामधून फोन येत आहेत आणि ज्या लोकांनी हे जाणून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी हे स्टेटमेंट आहे. जवळपास दोन वर्षांपूर्वीच अभिनवनं मला त्याच्या कामापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे त्याच्या बोलण्यावर मी कोणतीही प्रतिक्रिया देणं योग्य नाही. रिया चक्रवर्तीनं ‘या’ कारणामुळे घाबरुन सोडलं होतं सुशांतचं घर, आता झाला खुलासा
For the media calling me and people who want to ask , treat this as my statement. “More than two years ago , Abhinav had told me clearly to stay out of his business and it’s not my place to comment on anything he says or does.“ Thank You
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) June 16, 2020
काय म्हणाले अभिनव कश्यप YRF सारख्या एजन्सींनीच कदाचित सुशांत असं टोकाचं पाऊल उचलण्यास भाग पाडलं आहे. त्यामुळे या प्रकरणाची या अँगलनं चौकशी व्हायला हवी. या एजन्सी कलाकारांचं करिअर बनवत नाही तर बिघडवण्याचं काम करतात. मी स्वतः याचा अनुभव घेतला आहे. हा अलिखित कोड ऑफ कंडक्ट आहे. या एजन्सी कलाकारांना साइन केल्यानंतर आपली ती मनमानी करतात. दबंग मेकिंगच्यावेळी माझ्यासोबतही काहीसं असंच घडलं होतं. अभिनव यांनी त्याच्या पोस्टमध्ये त्यांचा स्वतःचा अनुभव शेअर केला होता. त्यांनी लिहिल, दबंग मेकिंगच्या वेळी माझ्यासोबतही हे सर्व घडलं आहे. त्यावेळी अरबाज खान, सोहेल खान आणि त्याच्या कुटुंबीयांनी फक्त मला घाबरवलं, धमकावलं नाही तर त्यांनी माझं करिअर कंट्रोल करण्याचाही प्रयत्न केला. अरबाज माझा दबंग नंतर दुसऱ्या सिनेमाचा प्रोजेक्ट सुद्धा आपल्या फॅमिली पावरचा वापर करून माझ्याकडून काढून घेतला होता. ज्यामुळे माझं खूप नुकसान झालं होतं. दबंगच्या रिलीजच्या वेळी माझी नकारात्मक प्रतिमा तयार करण्यात आली आणि माझी नकारात्मक पब्लिसिटी केली गेली. वेगवेगळ्या नंबरवरून आल्या धमक्या अभिनव यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं, माझ्या पर्सनल लाइफमध्ये अनेक चढ-उतार आले पण हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही. मला वेगवेगळ्या नंबरवरून धमकी देण्यात आली. मी त्यावेळी पोलीसांत तक्रार सुद्धा केली होती. अभिनवनं त्याच्या पोस्टमध्ये जे लोक आपली मनमनी करून कलाकारांनी असं वर्तन करतात. त्यांचा पर्दाफाश करणं गरजेच आहे आणि यात सर्वात मोठी व्यक्ती आहे ती म्हणजे सलमान खान असं म्हणत सलमानवर थेट आरोप केले आहेत.
करिना-शाहरुख यांनी सुशांतला दिली होती अपमानास्पद वागणूक, नेटिझन्सचा आरोप
‘अनिल कपूरची मुलगी नसतीस तर..’ सोनमच्या ‘त्या’ ट्वीटवर का भडकले नेटकरी