मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

रिया चक्रवर्तीनं 'या' कारणामुळे घाबरुन सोडलं होतं सुशांतचं घर, आता झाला खुलासा

रिया चक्रवर्तीनं 'या' कारणामुळे घाबरुन सोडलं होतं सुशांतचं घर, आता झाला खुलासा

सुशांतनं आत्महत्या करण्याच्या काही दिवस आधीच ती सुशांतचं घर सोडून गेल्याचंही सांगण्यात येत होतं पण आता यामागचं कारण स्पष्ट झालं आहे.

सुशांतनं आत्महत्या करण्याच्या काही दिवस आधीच ती सुशांतचं घर सोडून गेल्याचंही सांगण्यात येत होतं पण आता यामागचं कारण स्पष्ट झालं आहे.

सुशांतनं आत्महत्या करण्याच्या काही दिवस आधीच ती सुशांतचं घर सोडून गेल्याचंही सांगण्यात येत होतं पण आता यामागचं कारण स्पष्ट झालं आहे.

  • Published by:  Megha Jethe
मुंबई, 16 मे : सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. त्यानं मुंबईतल्या त्याच्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यानंतर त्याची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीबाबत उलट-सुटल चर्चा झाल्या. या दोघांमध्ये वाद होते असंही बोललं गेल. तसेच सुशांतनं आत्महत्या करण्याच्या काही दिवस आधीच ती सुशांतचं घर सोडून गेल्याचंही सांगण्यात येत होतं मात्र आता लेखिका सुहरिता सेनगुप्ता यांनी एका मुलाखतीत रियानं सुशांतचं घर सोडण्यामागचं कारण स्पष्ट केलं. दिग्दर्शक महेश भट यांच्या सहकारी आणि लेखिका सुहरिता सेनगुप्ता यांनी नॅशनल हेराल्ड इंडिया डॉटकॉमशी बोलताना सुशांतबाबत अनेक खुलासे केले. त्या म्हणाल्या, सुशांत खूप बोलका होता. त्याचं नॉलेज खूप चांगलं होते. 'सडक 2'साठी जेव्हा ते भट यांना भेटायला आला होता तेव्हा माझी त्याची भेट झाली होता. अवघ्या काही मिनिटांत त्या दोघांची वेगवेगळ्या विषयांवर चर्चा सुरू झाली. पण त्यावेळी त्याच्या बोलण्यात जी उदासीनता होती ती मुकेश भट यांच्या नजरेतून सुटली नाही. त्यांनी, सुशांत परवीन बाबीच्या मार्गावर चालला आहे असं त्यावेळी बोलूनही दाखवलं होते. करिना-शाहरुख यांनी सुशांतला दिली होती अपमानास्पद वागणूक, नेटिझन्सचा आरोप सुहरिता सेनगुप्ता पुढे म्हणाल्या, सुशांतवर मागच्या काही काळापासून उपचार सुरू होते. निराशेच्या गर्तेत जाणाऱ्या सुशांतला बाहेर काढण्याचा प्रयत्न रियाने (चक्रवर्ती) अनेकदा केला. सुशांतने औषध वेळेवर घ्यावीत योग्य उपचार घ्यावेत यासाठी सतत ती त्याच्या मागे लागायची. मात्र त्याने औषधं घेणं बंद केलं होतं. औषधं घेणं बंद केल्याने सुशांतचा मानसिक आजार आणखीन वाढला. “मागील एका वर्षात त्याने बाहेरच्या व्यक्तींशी संपर्क ठेवणं हळूहळू बंद केलं. रियानेही परिस्थिती हाताबाहेर जाईपर्यंत सुशांतला संभाळून घेत त्याच्याबरोबर राहिली.
सुहारिता यांनी सांगितलं, त्याच्या लाइफमध्ये एक वेळ अशी आली की, त्याला माणसांचे भास व्हायला लागले. एक दिवस सुशात आणि रिया सुशांतच्या घरी अनुराग कश्यपचा चित्रपट बघत असतानाच अचानक सुशांतने, मी अनुरागच्या ऑफरला नकार दिला. आता तो मला मारायला येणार, असं काहीतरी बोलू लागला. त्या प्रसंगाचा रियाला मोठा धक्का बसला. रिया सुशांतबरोबर राहण्यास घाबरु लागली. तिच्याकडे त्याच घर सोडण्या व्यतिरिक्त पर्यायच उपलब्ध नव्हता. भट यांनी तिला सांगितलं होतं की आता तु या परिस्थितीला काही करू शकत नाही. तु त्याच्यासोबत राहिलीस तर तुझ्यावर त्याचा प्रभाव पडायला सुरुवात होईल. दिग्दर्शकाचा सलमानवर थेट आरोप, सुशांतच्या आत्महत्येच्या निपक्षपाती चौकशीची मागणी सुशांतच्या बहिणीने येऊन सुशांतची काळजी घेण्यास सुरुवात करेपर्यंत रिया त्याच्या सोबत राहिली. सुशांतची बहिणीनेही त्याला हवा तो सर्व पाठिंबा देण्यास आणि त्याची काळजी घेण्यास सुरुवात केली. मात्र तो कोणाचेही काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. तो कोणालाही त्याच्या मदतीसाठी त्याच्या जवळ येऊ देत नव्हता. याच मानसिक परिस्थितीमुळे त्याने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. 'अनिल कपूरची मुलगी नसतीस तर..' सोनमच्या 'त्या' ट्वीटवर का भडकले नेटकरी
First published:

Tags: Bollywood, Sushant Singh Rajput

पुढील बातम्या