मुंबई, 16 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची (sushant singh rajput) आत्महत्या म्हणजे सर्वांसाठी धक्का आहे. मात्र त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे (ankita lokhande) या धक्क्यातून सावरलेली नाही. आजच ती सुशांतच्या मुंबईतील घरी गेली, तिथला व्हिडीओ आता समोर आला आहे. ज्यामध्ये अंकिताची अवस्था काय झाली आहे, ते दिसून येतं. सुशांतच्या मृत्यूची बातमी कळताच अंकिता सुन्न झाली. एका न्यूज चॅनेलवरून तिला फोन गेला आणि बातमी ऐकल्यानंतर दुसऱ्याच क्षणी तिने फोन कट केला. सुशांतच्या आत्महत्येनं ती प्रचंड दु:खी आणि अस्वस्थ झाली आहे. आज आपल्या परिवारासोबत सुशांतच्या वांद्रे येथील घरी ती पोहोचली. सुशांतच्या कुटुंबीयांची तिने भेट घेतली.
सुशांत सिंह राजपूतला सर्वात आधी ओळख मिळवून दिली आणि घराघरात पोहोचलं ते झी टीव्हीवरील पवित्र रिश्ता या मालिकेने. पवित्र रिश्ता या मालिकेतील मानव-अर्चना या जोडीने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. पण त्यासोबत नंतर अंकिता आणि सुशांत हे दोघेही एकत्र आले होते.
मात्र नंतरच्या काळात काही मतभेद झाले आणि सुशात-अंकिता यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. जेव्हा सुशांत आणि अंकिताचा ब्रेकअप झाला तेव्हा बर्याच बातम्या समोर आल्या होत्या. या बातम्यांना उत्तर देताना सुशांतने स्वत: असे म्हटले होते की, नाही अंकिता मद्यपी आहे, नाही मी वुमेनायजर आहे. ब्रेकअप करण्याचे कारण सांगून तो म्हणाला की - ‘लोक फक्त एकमेकांपासून दूर जातात .. आणि हे खूप दुर्दैवी आहे’ हे वाचा - करिना-शाहरुख यांनी सुशांतला दिली होती अपमानास्पद वागणूक, नेटिझन्सचा आरोप त्यानंतर सुशांत बराच काळ खचलेल्या मानसिकतेत गेला होता. काही दिवसांपूर्वीच सुशांतची एक्स गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडे हिची एका बिझमनसोबत एंगेजमेन्ट झाली आहे. संपादन - प्रिया लाड हे वाचा - दिग्दर्शकाचा सलमानवर थेट आरोप, सुशांतच्या आत्महत्येच्या निपक्षपाती चौकशीची मागणी