मुंबई, 18 जून: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे (Sushant Singh Rajput Suicide) सगळ्यांच्या काळजाला चटका लागला आहे. सुशांतनं गेल्या रविवारी (14 जून) मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हेही वाचा… ‘मला माफ कर माझ्या बाळा’ सुशांतच्या बहिणीची भावनिक पोस्ट वाचून डोळ्यात येईल पाणी सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या निधनानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. त्यात प्रसिद्ध टीव्ही प्रोड्यूसर विकास गुप्ता (Vikas Gupta)यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून विकास गुप्ता यांनी सुशांत आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिच्यामधील नात्याबाबत महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. विकास गुप्ता यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. फोटो खूप जुना आहे. फोटोत सुशांत त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेसोबत दिसत आहे. सुशांत आणि अंकिता ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत सोबत काम करत होते. तेव्हाचा हा फोटो असावा. विकास यांनी या फोटोसोबत एक भावनिक पोस्टही लिहिली आहे. सुशांतच्या आयुष्यात अंकिता लोखंडेचं स्थान अत्यंत महत्त्वाचं होतं, हे सांगण्याची प्रयत्न विकास गुप्ता यांनी या पोस्टमधून केला आहे.
विकास यांनी लिहिलं आहे की, ‘हा तो काळ होता, तेव्हा सुशांत प्रचंड आनंदी आणि बिंधास्त राहात होता. त्या कशाचीही चिंता नव्हती. टीव्हीवरील नंबर वन शो मध्येच सोडून एक-एक आठवडा रिकामे राहणं. चहा-कॉफीवर सिनेमाचं प्लनिंग करत होता. मला चांगलं लक्षात आहे की, त्यानं ‘औरंगजेब’साठी स्पष्ट नकार दिला होता. कारण त्याला मुख्य अभिनेत्याच्या भावाची भूमिका ऑफर करण्यात आली होती. तो एकदा म्हणाला होता की, यशराज यांना नकार कसा देऊ. मात्र, फोटोत दिसणारी तरुणी (अंकिता लोखंडे) त्याला म्हणायची, जे तुला आनंद देईल, तेच काम कर आणि हे ऐकूण सुशांत केवळ हसत होता.’ हेही वाचा… VIDEO :चाहत्यांच्या मनात तू कायम जिवंत राहशील; सुशांतच्या अस्थींचं गंगेत विसर्जन विकास यांनी पुढे लिहिले आहे की, ‘मी त्याला कायम एक हसणाऱ्या तरुणाच्या रुपात आठवणीत ठेऊ इच्छितो. तो कायम टेंशन फ्री राहत होता. कारण अंकिता हिता पाहताच त्याचं टेंशन नाहीसं होत होतं. अंकिता लोखंडे तू त्याची shock Absorber होती. तिच्या चेहऱ्यावर हास्य येईपर्यंत तू त्याला सोडत नव्हती..’