VIDEO : चाहत्यांच्या मनात तू कायम जिवंत राहशील; साश्रू नयनांनी सुशांतच्या अस्थींचं गंगेत विसर्जन

VIDEO : चाहत्यांच्या मनात तू कायम जिवंत राहशील; साश्रू नयनांनी सुशांतच्या अस्थींचं गंगेत विसर्जन

सुशांतचं आणि त्याच्या चाहत्यांचं एक अनोखं नातं आहे. तो या जगात नसला तरी प्रत्येक चाहत्याच्या मनात तो कायम जिवंत राहिलं.

  • Share this:

पाटना, 18 जून : बॉलिवूडमधील एनर्जेटिक व्यक्तिमत्व अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या अस्थीकलशांचे आज गुरुवारी पाटणा येथे विसर्जन करण्यात आले. गुरुवारी दुपारी पाटणा येथील गंगा घाटावर सुशांत सिंह राजपूत याच्या कुटुंबीयांनी त्याच्या अस्थीचं विसर्जन केलं. कुटुंबीयांनी बोटीतून जात गंगेच्या मध्यभागी त्याच्या अस्थींचं विसर्जन केलं. यावेळी सुशांतसिंग राजपूत यांचे वडील केके सिंग, बहीण श्वेतासिंग कृती यांच्यासह कुटुंबातील काही खास लोक उपस्थित होते.

सुशांत सिंह राजपूत याच्या अस्थी विसर्जनाची माहिती जशी चाहत्यांना मिळाली तशी घाटाजवळ मोठी गर्दी जमू लागली. अनेक जणांना त्याचं शेवटचं दर्शन घ्यायचं होतं. सुशांतच्या अकाली जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. त्यापेक्षाही मनात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. चाहत्यांसाठी तरी..त्याच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्यांसाठी तरी सुशांतने अशी टोकाची भूमिका नको घ्यायला होती, अशी प्रतिक्रिया येत आहे. नैराश्यातून बाहेर येता येऊ शकतं, पण सुशांतने मृत्यूचा मार्ग का स्वीकारला याबाबत तपास सुरू आहे.

आज साश्रू नयनांनी त्याच्या कुटुंबीयांनी अस्थीचं विसर्जन केलं. आपल्या तरुण मुलाच्या अस्थी हातात घेतल्यावर त्याच्या वडिलांचे हात नक्कीच जड झाले असतील. बुधवारी सुशांत सिंहचे वडील व त्याची बहीण मुंबईहून पाटनातील राजीव नगर येथे पोहोचले होते. चित्रपटसृष्टीतील एक मोठा स्टार असतानाही त्याचा साधेपणा लोकांना खूप भावला. गेल्या काही दिवसांपासून त्याच्यातील माणुसकी दाखविणारे अनेक व्हिडीओ पाहायला मिळत आहे. तो चांगला अभिनेता तर होताच..मात्र त्याहूनही तो खूप चांगला माणूस होता.

सुशांतच्या कुटुंबाशी जोडलेल्या लोकांनी सांगितले की, त्याचे श्राद्ध पाटन्यातून होईल. पुर्णिया गावातून त्याची पूजा केली जाण्याचीही शक्यता आहे. रविवारी बिहारच्या प्रतिभावान अभिनेत्याने मुंबईतील फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. सुशांतनं रविवारी 14 जूनला त्याच्या मुंबईतल्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. नेहमीच हसतमुख आणि एनर्जेटिक राहणाऱ्या या अभिनेत्यानं एवढं टोकाचं पाऊल का उचललं हा प्रश्न सर्वांना पडला आहे.

हे वाचा-'मला माफ कर माझ्या बाळा' सुशांतच्या बहिणीची भावनिक पोस्ट वाचून डोळ्यात येईल पाणी

संपादन - मीनल गांगुर्डे

First published: June 18, 2020, 3:19 PM IST

ताज्या बातम्या