'मला माफ कर माझ्या बाळा...' सुशांतच्या बहिणीची भावनिक पोस्ट वाचून डोळ्यात येईल पाणी

'मला माफ कर माझ्या बाळा...' सुशांतच्या बहिणीची भावनिक पोस्ट वाचून डोळ्यात येईल पाणी

सुशांतची बहीण श्वेता ही परदेशात राहते. त्यामुळे सुशांतच्या अंत्यसंस्कारांच्या वेळी ती भारतात पोहोचू शकली नव्हती

  • Share this:

मुंबई, 18 जून : सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. सुशांतनं वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षीच जगाचा निरोप घेतला. नैराश्यात सुशांतनं असं टोकाचं पाऊल उचलल्या बोललं जात आहे. त्याच्या निधनानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी त्याला श्रद्धांजली वाहिली. पण या धक्क्यातून त्याचं कुटुंब सुद्धा अद्याप सावरलेलं नाही. सुशांतला एकूण चार बहिणी होत्या त्यापैकी एकीच काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं. पण सर्वांत लहान असलेल्या सुशांतचं अशाप्रकारचं जाणं त्याच्या बहिणींच्या मनाला चटका लावून गेलं. सुशांतची बहीण श्वेतानं आता भावासाठी एक इमोशनल पोस्ट लिहिली आहे. जी सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.

सुशांतची बहीण श्वेता ही परदेशात राहते. त्यामुळे सुशांतच्या अंत्यसंस्कारांच्या वेळी ती वेळेवर पोहोचू शकली नाही मात्र तिनं सोशल मीडियावर सुशांतसाठी एक पोस्ट लिहिली आहे. सुशांत भावंडांमध्ये सर्वात लहान असल्यानं सर्वांचं त्याच्यावर खूप प्रेम होतं आणि हे प्रेम श्वेताच्या पोस्टमध्ये दिसत आहे. तिनं लिहिलं, माझ्या बाळा आज तू शरीरानं आमच्यात नाहीस पण ठीक आहे. मला माहित आहे की, तू कोणत्या वेदनेतून जात होतास. पण तू एक योद्धा होतास आणि शूरपणे लढलास. तुला ज्या दुःखातून जावं लागलं, ज्या वेदना झाल्या त्यासाठी मला क्षमा कर. मला शक्य असतं तर मी तुझी सर्व दुःख घेतली असती आणि माझा सगळा आनंद तुला दिला असता.

तक्रार दाखल झाल्यानंतर भन्साळींचा दावा, सुशांतला ऑफर केले होते 4 सिनेमा

याआधीही श्वेतानं तिच्या फेसबुकवर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये तिने एक विशेष घटना देखील नमूद केली आहे. तिच्या मुलाबरोबर झालेलं संभाषण तिने या पोस्टमध्ये सांगितलं आहे. ती म्हणते आहे की, जेव्हा मी माझा मुलगा निर्वाण सांगितलं की मामा आता आपल्यात राहिले नाही तेव्हा तो म्हणाला की 'पण तो तुमच्या हृदयात अजूनही जिवंत आहे'. हे वाक्य तो 3 वेळा म्हणाला असंही श्वेताने या पोस्टमध्ये लिहिलं आहे. जर पाच वर्षाचा मुलगा अशी बाब बोलतो तेव्हा विचार करा आपण किती खंबीर आहोत, असंही श्वेता यावेळी म्हणाली.

सुशांतच्या बहिणेने त्याच्या फॅन्सना असा संदेश दिला आहे की, तो आपल्या हृदयात अजूनही जिवंत आहे आणि तो तिथे कायम राहील. कृपया त्याच्या आत्म्याला त्रास होईल असं कुणीही वागू नका, खंबीर राहा.

कोणामुळे सुशांतला त्रास झाला? चाहत्यांच्या प्रश्नाला शेखर कपूर यांचं उत्तर

First published: June 18, 2020, 1:02 PM IST

ताज्या बातम्या